मोदींचा करिश्मा कायम, हे आहेत भारतातले सगळ्यात 'लोकप्रिय' मुख्यमंत्री

केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा शपथ घेऊन एक वर्ष झालं आहे.

Updated: Jun 3, 2020, 09:17 PM IST
मोदींचा करिश्मा कायम, हे आहेत भारतातले सगळ्यात 'लोकप्रिय' मुख्यमंत्री title=

मुंबई : केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा शपथ घेऊन एक वर्ष झालं आहे. ६ वर्ष पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर नरेंद्र मोदींची लोकप्रियता अजूनही कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ६५ टक्के, तर मुख्यमंत्री म्हणून ओडिशाचे मुख्यमंत्री यांना सर्वाधिक पाठिंबा मिळाल्याचं सर्वेक्षण सी व्होटर या संस्थेने केलं आहे.

सर्वेक्षण केलेल्या एकूण व्यक्तींपैकी ६६.२ टक्के लोकांनी मोदींच्या नावाला तर २३.२१ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पाठिंबा दिला. देशाभरात सर्वेक्षण केलेल्यांपैकी ५८.३६ टक्के लोकं पंतप्रधानांच्या कामगिरीवर अत्यंत समाधानी आहेत, तर २४.०४ टक्के समाधानी आणि १६.७१ टक्के अजिबात समाधानी नाहीत.

राज्यांमध्ये ओडिशामधून पंतप्रधानांना सर्वाधिक ९५.६ टक्के तर हिमाचल प्रदेशमधून ९३.९५ टक्के आणि छत्तीसगडमधून ९२.७३ टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. तर दक्षिणेतल्या तामिळनाडूतील ३२.८९ टक्के लोकं आणि केरळमधील ३२.१५ टक्के लोकं मोदींच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. महाराष्ट्रातून ७१.४८ टक्के लोक पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर संतुष्ट आहेत.

लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओडिशाचे नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल दुसऱ्या, केरळचे पिनराई विजयन तिसऱ्या क्रमांकावर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी चौथ्या, उद्धव ठाकरे पाचव्या, अरविंद केजरीवाल सहाव्या क्रमांकावर आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर सातव्या आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आठव्या क्रमांकावर आहेत.

अत्यंत कमी लोकप्रियता असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री टीएस रावत आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, बिहारचे नितीश कुमार, तामिळनाडूचे पलानीस्वामी, गोव्याचे प्रमोद सावंत, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे के चंद्रशेखर राव आहेत.

केंद्र सरकारबाबत समाधानी 

सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार हिमाचल प्रदेश (९७.४६ टक्के),  ओडिशा (९५.७३ टक्के) आणि छत्तीसगड (९१.४२ टक्के) चे नागरिक एनडीए सरकारच्या कामगिरीवर ९० टक्क्यांपेक्षा जास्त समाधानी आहे. 

सर्वेक्षण केलेले ६२ टक्के लोकं केंद्र सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहे. तर तीन राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींपेक्षा राहुल गांधी लोकप्रिय आहेत. गोवा (५२.४ टक्के), केरळ (४६.८७ टक्के) आणि तामिळनाडू (४२.७६ टक्के) या राज्यांमध्ये राहुल गांधींची लोकप्रियता मोदींपेक्षा जास्त आहे. मोदींची लोकप्रियता गोव्यात ४१.३ टक्के, केरळमध्ये ३६.४ टक्के आणि तामिळनाडूमध्ये ३७.६४ टक्के एवढी आहे. सी व्होटरच्या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक राज्यातल्या ३ हजार लोकांना समाविष्ट करण्यात आलं होतं.