नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढता येतात एवढेच आपल्याला माहिती असते. पण एटीएममधून पैसे कमावताही येतात याबद्दल आज आपण जाणून घेवू. घर किंवा ऑफिसच्या मोक्याच्या ठिकाणी एटीएम लावून घरी बसून तुम्गी लाखोची कमाई करू शकता. यासाठी बाजार किंवा गर्दीच्या ठिकाणी दुकान, कार्यालय किंवा घर असणे आवश्यक आहे.
व्हाईट लेव्हल एटीएम फ्रान्चायझी वापरून तुम्ही एटीएम उघडू शकता. व्हाईट लेव्हल एटीएम सर्व्हिस पुरविणारी कंपनी आहे. ही कंपनी शहर आणि गावांमध्ये एटीएम स्थापन करण्यासाठी फ्रँचाइजी देते. सार्वजनिक आणि खाजगी बँकांव्यतिरिक्त इंडिकॅश, मुथूट व इंडिया वन सारख्या कंपन्यांना व्हाईट लेव्हल एटीएम सर्व्हिस देतात.
• एटीएम ठेवण्यासाठी ५० ते १०० चौरस फूटची जागा असावी
• स्थान तळमजला आणि चांगले दृश्यमान असणे आवश्यक आहे.
• एटीएम लावण्यासाठी तुम्हासा सेक्युरिटी डिपॉझिट भरावी लागेल.
• सुरक्षेची व्यवस्था आपल्यालाच करावी लागेल.
-कंपनी आपल्याला भाडे नाही तर एटीममध्ये झालेल्या व्यवहारानुसार पैसे देईल.
- एटीएममधील प्रत्येक ५० ट्रान्झाक्शननंतर महिन्याला ९५०० रुपये मिळू शकतात.
- रोज झालेल्या १०० व्यवहारांवर मासिक उत्पन्न ७८ हजार रुपयांपर्यंत जावू शकते.
- रोजच्या ३०० व्यवहारांवर १ लाख १७ हजार रुपये मासिक उत्पन्न तुम्हाला मिळू शकते.