मुंबई : या आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी देखील शेअर बाजारात घसरण नोंदवली गेली आहे. ग्लोबल मार्केटमधून मिळणाऱ्या नकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजारातही घसरण नोंदवली जात आहे. या घसरणीदरम्यानही गुंतवणूकदार गुंतवणूकीसाठी चांगल्या स्टॉकच्या शोधात आहेत. या गुंतवणूकदारांसाठी मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी ऑटो सेक्टरमधील एका स्टॉकवर गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी खरेदीसाठी Fiem Industries ltd ची निवड केली आहे. एक्सपर्ट्सने सांगितलं की, या शेअरवर त्यांनी 2 वेळा खरेदीचा सल्ला दिला आहे. एक्सपर्ट्सने सांगितलं की, सोमवारी बाजाराच्या मोठ्या पडझडीनंतरही या शेअरमध्ये तेजी होती. म्हणजेच मोठे गुंतवणूकदार या शेअरमध्ये अद्यापही खरेदी करीत आहेत.
सध्या ऑटो एसिलिरी स्टॉक तेजीत आहेत. संपूर्ण क्षेत्रात या कंपनीची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. या कंपनीचे देशात 9 प्लांट आहेत.
CMP - 1040
Target - 1290
तज्ज्ञांच्या मते, कंपनीचे वॅल्यूएशन खूपच स्वस्त आहे आणि स्टॉक 14 च्या PE मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. याशिवाय, कंपनीचा इक्विटीवर परतावा 15-16 टक्के आहे. कंपनीवर केवळ 45 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
तज्ज्ञांनी सांगितले की, कंपनीमध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी सुमारे 67 टक्के आहे आणि FII चीही त्यात चांगली भागीदारी आहे. चौथ्या तिमाहीच्या निकालांबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीचे मार्जिन स्थिर राहिले आणि OPM सुमारे 15 टक्के होता.