Home Loan ऐवजी भाड्याचे घरात राहणे योग्य? EMI च्या पैशांनी घेऊ शकता 2-3 घरे

EMI vs Rent: लोक स्वतःचे घर बांधण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. त्याचबरोबर महागाईमुळे काही लोक भाड्याच्या घरात राहणे पसंत करतात. अशा परिस्थितीत स्वतःचे घर घेणे योग्य की भाड्याने राहणे योग्य, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. ते समजून घेऊया.

Updated: Jan 13, 2022, 05:22 PM IST
Home Loan ऐवजी भाड्याचे घरात राहणे योग्य? EMI च्या पैशांनी घेऊ शकता 2-3 घरे title=

मुंबई : स्वत:चे घर बांधण्याचे अनेकांचे स्वप्न असते, ते पूर्ण करण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. काही लोक घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्जही घेतात. पण काही लोकं भाड्याच्या घरात राहणे पसंत करतात. कोरोनामुळे दिल्ली-एनसीआर, मुंबईसह देशातील अनेक महानगरांमध्ये भाडे कमी झाल्याच्या बातम्याही येत आहेत. जेव्हा तुम्ही घर खरेदी करता तेव्हा त्याच्या ईएमआयच्या व्याजाचा भार वाढतो. अशा परिस्थितीत आपले घर घेणे आवश्यक आहे की भाड्याने राहणे योग्य हा प्रश्न उपस्थित होतो. 

EMI आणि भाड्याचे गणित समजून घ्या
जेव्हा तुम्ही Home Loan घेऊन घर खरेदी करता तेव्हा त्याची परतफेड  करावी लागते. बंगलोरमधील एका मालमत्तेद्वारे ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया. समजा सध्या मालमत्तेचे बाजारमूल्य 50 लाख रुपये आहे. ही मालमत्ता विकत घेण्याचा किंवा भाड्याने घेण्याचा निर्णय तुम्ही कसा घ्याल?

आधी भाड्याचे गणित समजून घेऊ. जर कोणाला ही मालमत्ता भाड्याने घ्यायची असेल तर त्याला दरमहा 12 ते 14 हजार रुपये भाडे द्यावे लागेल. हा खर्च 11 महिन्यांनंतर वाढेल. हे घर टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला 5-10 टक्क्यांची वाढ द्यावी लागेल. तुमचा पगारही वाढत राहील परंतू महागाईचा दरही वाढत राहतो.

घर खरेदी केल्यास तुम्ही Home loan घ्याल (20 टक्के डाउन पेमेंट - 80 टक्के कर्ज), तेव्हा तुम्हाला 20 वर्षांसाठी 32,000 रुपयांचा EMI ( 7.5 टक्के व्याजदर ) भरावा लागेल. जर तुम्ही 50 टक्के डाऊन पेमेंट भरले तर तुम्हाला त्यात 20 हजार रुपये मासिक हप्ता भरावा लागेल.

घराच्या देखभालीचाही खर्च
तुम्हाला जे घर आता 50 लाख रुपयांना मिळत आहे ते 20 वर्षांनंतर सुमारे 1.15 कोटी रुपयांमध्ये मिळेल. याशिवाय आज एखादे घर विकत घेतले तर 20 वर्षे त्याच्या देखभालीचा खर्च अनेक प्रकारचा असतो. 

20 वर्षांनंतर 2-3 घरे घेण्याची क्षमता
जर तुम्ही आता गृहकर्ज न घेता पैसे कुठेतरी गुंतवले तर 20 वर्षांनंतर तुमच्याकडे 15 टक्क्यांच्या परताव्यानुसार सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी असू शकतो. तुम्हाला 12 टक्के परतावा मिळाला तरी 20 वर्षांनंतर तुमच्याकडे सुमारे 2.5 कोटी रुपयांचा मोठा निधी असेल.

 भाड्याच्या घरात राहताना हुशारीने गुंतवणूक करणे नवीन घर घेण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक फायदेशीर ठरू शकते. 20 वर्षांनंतर, तुम्ही तेच घर खरेदी करून नफ्यात राहू शकता. इतकंच नाही तर या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही 20 वर्षांनंतर अशी 2-3 घरं खरेदी करू शकता.