एका Activa च्या किंमतीत खरेदी करा 2 इलेक्ट्रिक स्कूटर; सिंगल चार्जमध्ये 120 किमीपर्यंत दौड

देशातील इलेक्ट्रिक टु-व्हिलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कोमाकीने मागील वर्षी XGT-X1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केली होती

Updated: Oct 6, 2021, 01:35 PM IST
एका Activa च्या किंमतीत खरेदी करा 2 इलेक्ट्रिक स्कूटर; सिंगल चार्जमध्ये 120 किमीपर्यंत दौड title=

नवी दिल्ली : देशातील इलेक्ट्रिक टु-व्हिलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कोमाकीने मागील वर्षी XGT-X1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केली होती. तसेच कंपनीने यावर्षी स्कूटरच्या किंमतींमध्ये सुधारणा केली आहे. आता लिथियम-आयन बॅटरीसह स्कूटरची किंमत 60 हजार रुपये आणि GEL BATTERY सोबत 45 हजार रुपये असणार आहे.

Komaki XGT-X1 Electric Scooter चे फीचर्स कोमाकी XGT-X1मध्ये टेलीस्कोपिक शॉकर्स, रिमोट लॉक, ऍंटी थेफ्ट लॉक सिस्टिम, सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग सिस्टिम इत्यादी सारखे अनेक फीचर्स सामिल आहेत. कोमाकी आपली लिथियम - आयन बॅटरीवर 2+1 (1 वर्षाची सर्विस वॉरंटी)वर्ष आणि लेड - ऍसिड बॅटरीवर एका वर्षाची वारंटी देत आहे. कंपनीतर्फे XGT-X1मध्ये मोठा ट्रंक असण्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये रिमोट डायग्नोस्टिक्ससाठी सेंसर देखील आहे.

स्कूटरची रेंज 
ही इलेक्ट्रिक स्कूटर इको मोडमध्ये 100 किलोमीटर पासून ते 120 किलोमीटर पर्यत धावू शकते. त्यामुळे ग्राहक अधिक आकर्षित होत आहेत.

साधारणतः ऍक्टिवा स्कूटरची किंमत 85 हजाराच्या आसपास असते. याच किंमतीत कोमाकीच्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर घेता येतील.