Business Opportunity | घराचे छत रिकामे असेल तर करा बक्कळ कमाई; या आहेत संधी

जर कोणत्या शहराच्या परिसरात तुमचे घर किंवा बिल्डिंगचे छत रिकामे आहे. तर तुम्ही येथे अनेक बिझनेस करू शकता. असे बिझनेस तुम्हाला घरबसल्या चांगली रक्कम देऊ शकतात. 

Updated: Jul 6, 2021, 02:07 PM IST
Business Opportunity | घराचे छत रिकामे असेल तर करा बक्कळ कमाई; या आहेत संधी title=

मुंबई : जर कोणत्या शहराच्या परिसरात तुमचे घर किंवा बिल्डिंगचे छत रिकामे आहे. तर तुम्ही येथे अनेक बिझनेस करू शकता. असे बिझनेस तुम्हाला घरबसल्या चांगली रक्कम देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची सुद्धा गरज नाही. जर तुम्ही अजिबात गुंतवणूक करू इच्छित नसाल, तर छत भाड्याने देऊनसुद्धा कमाई करता येऊ शकते.

बिझनेसाठी बँका देतात कर्ज
अशा प्रकाराच्या काही बिझनेससाठी बँका लोन देतात. मार्केटमध्ये काही ऐजन्सिंज अशा आहेत की छताची माहिती घेऊन ते तुम्हाला बिझनेस आयडीया देतात. यातून तुम्हाला सोलर एनर्जीपासून ते टेलिकॉम इंडस्ट्रीपर्यंत बिझनेस आयडीया मिळू शकतात.

टेरेस फार्मिंग
टेरेस फार्मिंग भारतात सध्या पॉप्युलर होत आहे. बिल्डिंगच्या छतावर त्यासाठी ग्रीन हाऊस बनवणे गरजेचे आहे. याठिकाणी पॉलीबॅगमध्ये भाज्यांची रोपं लावता येतील. तसेच ड्रीप सिस्टीमद्वारे त्यांना सिंचित करता येते. तापमान आणि आद्रता नियंत्रणात ठेवण्यासाठी यंत्रणा लावावी लागेल. अशा पद्धतीने टेरेस फार्मिंगसुद्धा चांगला पर्याय आहे.

मोबाईल टॉवर 
जर तुमच्या बिल्डिंगचे छत रिकामे आहे. तर ते मोबाईल कंपन्यांना भाड्यानेसुद्धा देता येऊ शकते. टॉवर लावून दरमहा कंपनीकडून तुम्हाला भाडे सुरू राहू शकते. यासाठी तुम्हाला आजुबाजूच्या लोकांचे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावे लागेल. स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. 

होर्डिंग्स
जर तुमचे घर - बिल्डिंग अशा लोकेशनवर आहे की जेथून मोठा रस्ता महामार्ग दिसत असेल, तर तेथे होर्डिग्स लावून चांगली कमाई करता येऊ शकते.