नवी दिल्ली : योग्य माहिती आणि अनुभवाच्या आधारे व्यवसायामध्ये नक्कीच मोठा नफा कमावता येतो. कोरोना काळानंतर अनेकजण व्यवसायाकडे वळाले आहेत. तसेच नोकरीपेक्षा अनेकपट अधिक कमाई करीत आहेत. आम्ही आज एका उत्तम व्यवसायाची माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही 5 लाख रुपयांच्या गुंतवणूकीत दरमहा 70 हजार रुपयांपर्यंतची कमाई करू शकता. दूध, दही, लोनी आदी प्रोडक्टचा प्रत्येक घरात दररोज उपयोग होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला डेअरी बिझनेसबाबत माहिती देत आहोत.
डेअरी प्रोडक्टच्या बिझनेसमध्ये सरकारसुद्धा मदत करते. कोणत्याही व्यवसायासाठी भांडवलाची गरज पडते. जर स्मॉल स्केल बिझनेस करू इच्छित असाल तर, मुद्रा योजनेअंतर्गत पैशांची उभारणी करू शकता. या बिझनेससाठी सरकारकडून फंड सोबतच प्रोजेक्टबाबत पूर्ण माहिती मिळते.
जर तुम्ही हा बिझनेस सुरू करण्याचा विचार करीत असाल तर, सरकारी योजनांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रोजेक्ट प्रोफाइल अनुसार बिझनेस प्रोजेक्ट साधारण 16.50 लाख रुपयांपर्यंत तयार केला जाऊ शकतो. यामध्ये व्यक्तीला साधारण 5 लाख रुपये स्वतः गुंतवावे लागतील. इतर मदत तुम्हाला केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत मिळू शकते.
पंतप्रधान मुद्रा योजनेच्या प्रोजेक्ट अंतर्गत वर्षाला 75 हजार लीटर फ्लेवर्ड मिल्कचा व्यवसाय होऊ शकतो. यामाध्यमातून दही, लोनी आणि तुपाचेही उत्पादन घेता येते. आपल्या प्रोडक्टच्या व्यवस्थित मार्केटिंगचा जम बसल्यास महिन्याला 50 ते 70 हजार रुपयांपर्यतचे उत्पन्न सहज कमावता येईल.