धक्कादायक बातमी ! गावकऱ्यांनी हत्तीला पेटवले, उपचारासाठी नेताना मृत्यू

अंगावर काटा आणणारी बातमी. गावकऱ्यांनी हत्तीलाच (Elephant ) पेटवून दिले. हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मसिनागुडीत (Masinagudi )  घडला आहे.  

Updated: Jan 23, 2021, 09:18 AM IST
धक्कादायक बातमी ! गावकऱ्यांनी हत्तीला पेटवले, उपचारासाठी नेताना मृत्यू  title=

मसिनागुडी : अंगावर काटा आणणारी बातमी. गावकऱ्यांनी हत्तीलाच (Elephant ) पेटवून दिले. हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मसिनागुडीत (Masinagudi )  घडला आहे. गावात आलेल्या हत्तीला पिटाळून लावण्यासाठी गावकऱ्यांनी जळता टायर त्याच्या दिशेने फेकला. यात हत्ती होरपळून निघाला, अशी माहिती समोर आली आहे. (An elephant died in Masinagudi in Tamil Nadu)

गावकऱ्यांनी हत्तीला पळवून लावण्यासाठी अविचारीपणा केल्याचा प्रकार आहे. त्यांनी वनविभागाशी संपर्क साधण्याची गरज होती. मात्र, प्राण्यांबाबत अशी भूमिका घेताना विचार करण्याची गरज होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान, पेटवून दिल्याने हत्तीला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तामिळनाडूत हा प्रकार घडला आहे. 

हत्तीला पिटाळताना गावकऱ्यांनी जळता टायर फेकला होता, अशी माहिती समोर आली आहे. जळता टायर हत्तीच्या कानात अडकला आणि यामुळे त्याची पळापळ झाली. मसिनागुडी येथे झालेल्या या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हत्तीला पळवून लावण्यासाठी तो पेटणाऱ्या वस्तू फेकत होता, असे दिसत आहे. आगीमुळे हत्तीची पाठ आणि कान पूर्णपणे होरपळून निघाले आहे. १९ जानेवारीला वैद्यकीय उपचारासाठी हत्तीला नेले जात असताना त्याचा मृत्यू झाला.