११ जणांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढलेय, तांत्रिक महिलेला अटक

राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातील ११ जणांच्या मृत्यूचे गूढ दिवसागणिक वाढत आहे. ११ पाईप अन् ११ आत्महत्या याबाबत दिल्ली हादरली.

Updated: Jul 6, 2018, 10:54 PM IST
११ जणांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढलेय, तांत्रिक महिलेला अटक title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातील ११ जणांच्या मृत्यूचे गूढ दिवसागणिक वाढत आहे. ११ पाईप अन् ११ आत्महत्या याबाबत दिल्ली हादरली. सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढलेय. बुखारी सामूहिक हत्याप्रकरणी  तांत्रिक महिलेला अटक करण्यात आलेय. त्यामुळे या आत्महत्येमागे तांत्रिक मांत्रिक गोष्टी आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, भाटिया कुटुंबाने यापूर्वी तब्बल सहा वेळा सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा गौप्यस्फोट करण्यात आला होता. भाटिया कुटुंबाने दीड वर्षांपूर्वी उज्जैन येथे जाऊन तंत्र-मंत्रांची साधना केली होती अशीही माहिती समोर आली होती.

बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरणी रोजच नवनवे गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. या आत्महत्या प्रकरणामागे अंधश्रद्धा आणि तंत्र-मंत्राचा हात असल्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे. तांत्रिक महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या तिची कसून चौकशी करत आहेत. याच प्रकरणी क्राईम ब्रांचचे अधिकारी भाटिया कुटुंबाशी संबंधित एका तांत्रिक महिलेचा शोध घेत होते. अखेर हा शोध संपला आहे.

११ वह्या-११ वर्ष-११ मृत्यू, दिल्लीच्या धक्कादायक घटनेचा गुंता सुटला

अटक करण्यात आलेली महिला ही भाटिया कुटुंबाचे घर बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची बहीण आहे. भाटिया कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी कुटुंबातील मुख्य आणि आत्महत्येचा कट रचणारा ललित याने आत्महत्येपूर्वी आपल्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव गीता असून आपण भूत-प्रेत पळवून लावण्यामध्ये कुशल असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, यापूर्वी पोलिसांच्या हाती २८ जूनचे सीसीटीव्ही फुटेज लागले होते. यात सायंकाळी ७.३५ च्या दरम्यान भाटिया कुटुंबातील छोटा मुलगा ललित याची पत्नी टीना, आणि भुप्पीचा मुलगा ध्रुव घराजवळ असणाऱ्या फर्निचरच्या दुकानातून ४ टेबल आणताना दिसत आहेत. याच टेबलचा वापर करुन संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली.