बुलेटप्रेमींना हादरवणारी बातमी! नव्या कोऱ्या बुलेटचा बॉम्बसारखा स्फोट, VIDEO व्हायरल

इलेक्ट्रीक स्कुटर, सीएनजी कारला आग लागल्याच्या घटना पाहिल्या असतील पण बुलेटचा झाला स्फोट, नेमकं कारण काय?

Updated: Apr 4, 2022, 02:41 PM IST
बुलेटप्रेमींना हादरवणारी बातमी! नव्या कोऱ्या बुलेटचा बॉम्बसारखा स्फोट, VIDEO व्हायरल title=

Bullet Blast : आता बुलेटप्रेमींना हदरवून सोडणारी बातमी. आतापर्यंत तुम्ही इलेक्ट्रीक स्कूटर, सीएनजी कारला आग लागल्याच्या घटना पाहिल्या असतील. पण नव्या कोऱ्या बुलेटला आग लागल्याचं पाहिलंय का? एका व्यक्तीनं घेतलेल्या नव्या कोऱ्या बुलेटच्या बाबतीत असा प्रकार घडलाय. 

कर्नाटकमधल्या म्हैसूर इथ राहणाऱ्या रविचंद्रा नावाच्या व्यक्तीने नवी कोरी बुलेट विकत घेतली. या बुलेटची पूज करण्यासाठी तो आंध्रप्रदेशमधल्या प्रसिद्ध कासापुरम आंजनेय स्वामी मंदिरात गेला. उगाडी सणामुळे तिथे रथयात्रेचे आयोजन केले जाते. यामुळे तिथे मोठी गर्दी होती. एका पुजाऱ्यासोबत रविचंद्र पुजेची तयारी करत होता, तेवढ्यात बुलेटला आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण कळलं नाही.

बुलेटला आग लागल्यानंतर तिथे बघ्यांची एकच गर्दी जमली. आग विझवण्याचा प्रयत्न करत असातनाच अचानक या बुलेटचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की बॉम्बचा स्फोट झाल्याचा भास लोकांना झाला. स्फोटा लोकांची पळापळ सुरु झाली. 

बुलेटला लागलेली आग आणि त्यानंतर झालेला स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला याचा तपास आता केला जात आहे.