मुंबई : रविवारी हिमाचल प्रदेशातील सोलन येथे असणाऱ्या कुमारहट्टी येथे चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली. यामध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सैन्यदलातील १३ जवान आणि एका नागरिकाचा समावेश आहे. आतापर्यंत या दुर्घटनेदरम्यानच्या बचावकार्यातून एकूण ४२ जणांना बाहेर काढण्यात आलं.
सोलनचे उपायुक्त के.सी. चमन यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ज्यानंतर त्यांनी दुर्घटनाग्रस्त परिस्थितीची माहिती दिली. सोमवारी दुपारच्या सुमारास हे बचावकार्य पूर्ण होणार असल्याचंही ते म्हणाले होते.
Kumarhatti building collapse: 42 people, 30 Army personnel & 12 civilians, were trapped in the debris, all of them have been pulled out. 13 Army personnel & a civilian have died. #HimachalPradesh https://t.co/HWNDfQBSPt
— ANI (@ANI) July 15, 2019
Solan: One more body retrieved from the site of building collapse in Kumarhatti. Death toll rises to 8. 6 still trapped in the debris. Around 17 Army personnel & 11 civilians rescued so far. #HimachalPradesh pic.twitter.com/Hj5K1NwrQk
— ANI (@ANI) July 15, 2019
Himachal Pradesh: Search and rescue operation in Solan's Kumarhatti, where a building collapsed yesterday. is underway. 7 casualties have been reported till now - 1 civilian and 6 defence personnel, 7 more to be rescued. pic.twitter.com/Nza1Fs1Psg
— ANI (@ANI) July 15, 2019
Solan Dy Commissioner KC Chaman on building collapse in Solan: Around 17 Army personnel & 11 civilians rescued so far. 6 Army & 1 civilian casualties reported, 7 Army personnel are still feared trapped. Search&rescue operation to be completed by today afternoon. #HimachalPradesh pic.twitter.com/knjLdXAMEY
— ANI (@ANI) July 15, 2019
दरम्यान, ही दुर्घटना घडलेल्या कुमारहट्टी या ठिकाणी एक ढाबा होता. इमारत कोसळली त्यावेळी त्या ठिकाणी आसाम रायफलचे जवान जेवणासाठी थांबले होते. त्याच ठिकाणी एक पार्टीही सुरु होती. जखमींना नजीकच असणाऱ्या धरमपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यापैकी सातजणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं होतं.