Aadhar card Pan Card link status : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) सध्या लोकसभेत बजेट सादर (Budget 2023) करत आहेत. सर्व देशात भारताचा विकास दर अधिक आणि देश वेगाने प्रगती करत आहे, असं म्हणत सीतारमण यांनी भाषणाला सुरूवात केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) आज 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी पॅन कार्डला आता अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
इन्कम टॅक्सकडून एक महत्वाची आणि मोठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. यानुसार, तुम्हाला लवकरात लवकर तुमचं पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करावं लागणार आहे. कारण 31 मार्चपर्यंत जर तुम्ही लिंक केलं नाहीत तर ते बिनकामाचे समजण्यात येईल.जर तुम्हीसुद्धा अद्याप तुमचं पॅन आधारशी लिंक केलं नसेल तर घाई करा, ताबडतोब हे काम उरकून घ्या. (Aadhar card Pan Card link status online news in marathi)
असं न केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आयटी रिटर्न (IT Return ) तुम्ही फाईल करू शकणार नाहीत, इतकंच काय तर, आवश्यक अश्या सुविधांचा लाभसुद्धा घेऊ शकणार नाहीत. तुम्ही घरबसल्या पॅन कार्ड आधारसोबत लिंक करू शकतात, पॅन ते करण्यासाठी काही गाईडलाईन्स पाळाव्या लागतील , काय आहेत त्या गाईडलाईन्स चला जाणून घेऊया.