Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा

Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पॅनकार्ड (Pan Card) संदर्भात मोठी घोषणा केली आहे.  पॅन कार्डचा वापर आता सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल. या निर्णयाचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यासोबतच युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे.  डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबत डिजीलॉकरचा वापर वाढवण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे. 

पॅनकार्डसंदर्भात मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात पॅन कार्डचा वापर व्यवसायात कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल, असं सांगितलं. त्यामुळे व्यवसायात केवायसी करणं सोप होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या घोषणेचा उद्योगपतींना मोठा फायदा होणार आहे.

जोखीम-आधारित दृष्टीकोन (Risk-Based Approach) स्वीकारून KYC प्रक्रिया सुलभ केली जाईल, असं निर्मला सीतारमन यांनी सांगितलं. डिजीलॉकर सेवा आणि प्राथमिक ओळख म्हणून आधार वापरून ओळख अपडेट करण्यासाठी वन-स्टॉप सोल्यूशन सेट केलं जाईल. कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी एक समान ओळखकर्ता म्हणून वापरला जाईल.

सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल सिस्टीमसाठी PAN एक कॉमन ओळखपत्र म्हणून वापरता येईल.  परमनंट अकाउंट नंबर किंवा पॅन कार्ड हे देशातील विविध करदात्यांना ओळखण्याचे एक साधन ठरणार आहे. पॅन कार्ड एक 10-अंकी अद्वितीय ओळख अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे पॅन कार्ड प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य आहे आणि त्याचा वापर कर भरण्यासाठी देखील केला जातो.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Budget 2023 Live Update now pan card will be used for commen identity businessmen got a big gift
News Source: 
Home Title: 

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र बनणार
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, February 1, 2023 - 12:31
Created By: 
Rajiv Kasle
Updated By: 
Rajiv Kasle
Published By: 
Rajiv Kasle
Request Count: 
1
Is Breaking News: 
No