Union Budget 2023 Highlights: दणदणीत करसवलत आणि बरंच काही; पाहा अर्थमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली सर्वांच्याच नजरा लागल्या त्या म्हणजे करसवलत आणि इतर काही महत्त्वाच्या योजनांवर. पाहा सरकारनं याच योजनांबाबत नेमकी काय घोषणा केली? 

Updated: Feb 1, 2023, 03:33 PM IST
Union Budget 2023 Highlights: दणदणीत करसवलत आणि बरंच काही; पाहा अर्थमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा  title=
Union Budget 2023 by nirmala Sitharaman Highlights in 10 Easy points

Union Budget 2023 Highlights: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आणि समाजातील प्रत्येक घटकाचे कान टवकारले. विविध क्षेत्रांवर अर्थसंकल्पाचे परिणाम थेट दिसून येत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्राकडून पीएम गरीब कल्याण योजना आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या योजनांवर लक्ष केंद्रीत करत त्यासाठीच्या आर्थिक तरतुदींमध्ये वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत अर्थमंत्र्यांनी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या? पाहा... 

Union Budget 2023 मध्ये आतापर्यंतच्या मोठ्या घोषणा 

- 7 लाख रुपये वार्षिक उत्रपन्न असणाऱ्यांना करसवलत.
- अर्बन इंफ्रा फंडसाठी दरवर्षी 10000 कोटी रुपये 
- आणखी 50 नवे एअरपोर्ट्स, हॅलीपोर्ट्स आणि एअरोड्रम तयार करणार 
- ट्रान्सपोर्ट इंफ्रा प्रोजेक्टवर 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक 

हेसुद्धा वाचा : Budget 2023: देशातील महिलांसाठी खुशखबर,अर्थसंकल्पात मोठी घोषणा

- गुंतवणुकीवरील खर्चांसाठी 10 कोटी रुपये निश्चित 
- राज्यांना व्याजमुक्त कर्जसीमा 1 वर्षासाठी वाढवली 
- रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद 
- PM Housing Scheme वर रक्कम वाढवून 79,000 कोटी रुपये इतकी करण्यात आली. 
-  आदिवासी योजनांसाठी 3 वर्षांत 15 हजार कोटी रुपयांची तरतूद 
- गरीब कल्याण योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद