मुंबई : 2021 मध्ये 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाजारात मोठी तेजी आली होती. विकासाभिमुख अर्थसंकल्पामुळे बाजाराला सपोर्ट मिळाला आणि बाजारातील सेंटीमेंट मजबूत झाले. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स जवळपास 24 टक्क्यांनी वधारला आहे. त्याच वेळी, अर्थसंकल्पानंतर, एका महिन्यात सेन्सेक्स 2.6 टक्के किंवा सुमारे 1249 अंकांनी मजबूत झाला. यंदाचा अर्थसंकल्प अशा वेळी सादर होणार आहे. जेव्हा देशात कोविड 19 चे रुग्ण पुन्हा वाढत आहेत.
बाजारात अस्थिरता कायम आहे. जागतिक स्तरावरही महागाई आणि व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर बजेटवर नजरा खिळल्या आहेत. यंदाचाही अर्थसंकल्प विकासाभिमुख असण्याची अपेक्षा आहे.
आता आगामी काळात शेअर बाजारात तेजी येणार की घसरण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 2010 पासून आजपर्यंतची आकडेवारी पाहिली तर ती बाजाराला अनुकूल राहिली आहे. 12 वर्षात 7 वेळा अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स तेजीत राहिला झाला आहे.
2021 मध्ये 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यानंतर अर्थसंकल्पानंतर महिनाभरात सेन्सेक्स 2.6 टक्क्यांनी वधारला होता. 1 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान सेन्सेक्स 48601 ते 49850 पर्यंत वाढ झाली. अर्थसंकल्पाच्या दिवशी, 1 फेब्रुवारीला, सेन्सेक्स 2314 अंकांच्या म्हणजेच 5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर निफ्टी 647 अंक किंवा 4.75 टक्क्यांनी वाढला.
2010 ते 2020: बजेटनंतरचे दिवस