नवी दिल्ली : Bulli Bai app case : बुल्ली बाई अॅपच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. आसाममधून नीरज बिश्नोई (Neeraj Bishnoi) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनी ही मोठी कारवाई केली आहे. ('Bulli Bai' app case: Main conspirator arrested by Delhi Police’s IFSO special cell from Assam)
बुली बाई अॅपच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट करण्यात येत होत्या. तसेच मुस्लीम महिलांचे फोटो लिक करण्यात आले होते. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर मुख्य सूत्रधाराला अटक दिल्लीच्या विशेष सेल पोलिसांनी अटक केली आहे. गिटहबवर बुली बाई अॅप नीरज बिश्नोईने तयार केले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आसाममध्ये धडक कारवाई केली.
मुस्लीम महिलांचे फोटो बुली बाई या मोबाईल अॅपवर आक्षेपार्ह मजकूर टाकून अपलोड करण्यात आले होते. हा प्रकार 1 जानेवारी 2022ला उघड झाल्यानंतर त्यासंदर्भात आत्तापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या तिघांच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत आवळल्या होत्या. आता दिल्ली पोलिसांनीही धडक कारवाई करत नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला आसाममधून अटक केली आहे. हाच तरुण या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची माहिती डीएसपी केपीएस मल्होत्रा यांनी एएनआयला दिली आहे.
'Bulli Bai' app case: Main conspirator arrested by Delhi Police’s IFSO special cell from Assam pic.twitter.com/4IKBiBKC8d
— ANI (@ANI) January 6, 2022
डीसीपी केएसपी मल्होत्रा यांनी माहिती दिली की, नीरज मल्होत्रा यानेच गिटहबवर बुली बाई अॅप तयार केले आणि तोच या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याला आम्ही आसाममधून अटक केली आहे. या अॅपचं ट्विटर अकाउंट देखील नीरज बिष्णोईच चालवत होता.