मुंबई : Budget 2020 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन Finance minister, Nirmala Sitharaman यांनी शनिवारी संसदेत २०२०- २१ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. सकाळी अकरा वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. कृषी, आरोग्य, रेल्वे, पर्यटन अशा विविध क्षेत्रांसाठी अर्थंसंकल्पात काही तरतुदी करण्यात आल्या.
अर्थसंकल्प सादर होतेवेळी सर्वांच्याचनजरा लागल्या होत्या त्या म्हणजे नव्या करप्रणालीवर. नोकरदार वर्गापासून ते व्यावसायिक वर्गापर्यंत आणि बँक क्षेत्रात आर्थिक उलाढाल करणाऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पावर लागल्या होत्या.
अखेर बहुप्रतिक्षित अशा करप्रणालीतील नव्या तरतुदी संसदेत सादर करण्यात आल्या. ज्यामध्ये, मध्यमवर्गीयांच्या हाती पैसा राहावा या दृष्टीने सरकारने कर रचनेत बदल करून साडेसात ते दहा लाख उत्पनावर १५ टक्के कर आकारण्यात येणार असल्याचं सांगितलं.
याआधी अडीच लाख ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणार्या लोकांना पाच टक्के कर भरायचा होता. सरकारने आता हा कर हटवून ० ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणार्या लोकांना कोणताही कर भरावा लागणार नसल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर ५ लाख ते ७.५ पर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना आतापर्यंत २० टक्के कर भरावा लागला. आता ते १० टक्के करण्यात आला आहे.
एकिकडे अर्थसंकल्प सादर होत असताना कोणाला काय मिळालं याविषयीच्या चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे, सोशल मीडियावर या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं हेच कळत नसणारा वर्ग सक्रिय झाला. थोडक्यात सक्रिय झालेल्या या वर्गाने अर्थसंकल्पावर उपरोधिक अंदाजात टीका केली. मध्यमवर्गीयांनी त्यांच्या परीने या अर्थसंकल्पात आपल्या हाती काय आलं, याचा शोध घेतेवेळी त्यांची प्रतिक्रिया कशी असेल याची झलक पाहायला मिळाली.
1. Indians before budget speech.
2. Indians after budget speech.#Budget2020 pic.twitter.com/4G9WD2BIaQ— Nirmala Tai Halwe wali (@Vishj05) February 1, 2020
Middle class people searching budget benifits #Budget2020 pic.twitter.com/XALnAqo4pE
— Official Sam (@Official_Sam30) February 1, 2020
Middle class:Is baar humko bumper benefit milega
Govt:#BudgetSession2020#BudgetDay pic.twitter.com/XVELFX50UK— Syed_Amaan (@Hazzerdamaan1) February 1, 2020
Finance Minister Sitharaman :
Proposed to develop 5 new Smart
Friend : Vo 100 smart cities ka kya hua ?
Me : #Budget2020 pic.twitter.com/ljCcYSkdZa
— Hussعn (@Hussain_asger72) February 1, 2020
Finance minister to middle class. #Budget2020 pic.twitter.com/L4QRi1VRit
— Er- Ramkishor kataria (@Ramkishorkatar2) February 1, 2020
Kashmir and Kamal in the same sentence. #Budget2020 Nirmala Sitharaman recites a Kashmiri poem.
— Bhavani Giddu (@bgiddu) February 1, 2020
But but what happened to the 100 smart cities. Only 5 ? #Budget2020
— April's fool (@khandegautam) February 1, 2020
Budget 2020 : निर्मला सीतारामन यांच्या नावे सर्वात मोठ्या अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम
१०० स्मार्ट सिटीचं काय झालं? असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला. तर काहींनी अर्थसंकल्प सादर झाल्याच्या सुरुवातीलाच सीतारामन यांनी वाचलेल्या काव्यपंक्ती अधोरेखित केल्या. कमळ आणि काश्मीरचा उल्लेख असणाऱ्या या काव्यपंक्तींनी अनेकांचं लक्ष वेधलं. थोडक्यात काय, तर सोशल मीडियावर अर्थसंकल्पाविषयीच्या मीम्सनी अक्षरश: धुमाकूळ घातला असं म्हणायला हरकत नाही.