येडियुरप्पा संध्याकाळी ६ वाजता घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

कर्नाटकात एचडी कुमारस्वामी यांचं सरकार पडल्यानंतर आज भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केला आहे. 

Updated: Jul 26, 2019, 01:25 PM IST
येडियुरप्पा संध्याकाळी ६ वाजता घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ title=

बंगळुरु : कर्नाटकात एचडी कुमारस्वामी यांचं सरकार पडल्यानंतर आज भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केला आहे. भाजप नेते येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या शपथविधीची मागणी केली. संध्याकाळी सहा वाजता ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरविल्यानंतर भाजपनं हालचाली करत सत्तास्थापनेचा दावा केला.

कर्नाटकात पुन्हा नवं सरकार स्थापन होत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि तीन वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले बीएस येदियुरप्पा पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार आहेत.

गुरुवारी स्पीकर रमेश कुमार यांनी ३ आमदारांना अपात्र ठरवलं. १३ आमदारांचा निर्णय़ येणं अजून बाकी आहे. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. पण काँग्रेसने त्यांचा डाव उलटा करुन नये म्हणून भाजप सतर्क आहे.

विधानसभेत आता एकूण २०५ आमदार आहेत. या संख्याबळावरच आता मतदान घेतलं जाईल. भाजपकडे १०५, काँग्रेस-जेडीएसकडे ९९ आमदार आहेत. त्यामुळे भाजपला बहुमत सिद्ध करता येईल. पण जर काँग्रेसने बंडखोर आमदारांनी मन वळवलं तर मग भाजपसाठी धोक्याची घंटा ठरु शकते.

शुक्रवारी १०५ आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र येडियुरप्पा यांनी राज्यपालांना दिलं. अजूनही काही आमदार मुंबईतच आहेत. तर काही आपल्या मतदारसंघात परतले आहेत.