भावोजी- मेहूणीच्या प्रेमाने घेतलं धक्कादायक वळण आणि उचललं 'हे' मोठं पाऊल

 प्रेम हे प्रेम असतं आणि ते कधी आणि कोणाशी होऊ शकतं हे काही आपण सांगू शकत नाही. 

Updated: Sep 4, 2021, 04:57 PM IST
भावोजी- मेहूणीच्या प्रेमाने घेतलं धक्कादायक वळण आणि उचललं 'हे' मोठं पाऊल title=

बरेली : प्रेमात लोकं इतके आंधळे होतात की, ते वेळ, काळ, जात-धर्म, नतं काहीच पाहात नाही. प्रेम हे प्रेम असतं आणि ते कधी आणि कोणाशी होऊ शकतं हे काही आपण सांगू शकत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यांमध्ये एका नवऱ्याला त्याच्या बायकोच्या लहान बहिणीशी प्रेम झालं. हे प्रेम एकतर्फी नसून त्याच्या मेहूणीचं ही त्याच्यावरती प्रेम होतं.

म्हणून मग या दोघांनी ही कुटूंबाला अंधारात न ठेवता सगळ्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितलं परंतु कोणीही त्यांचं हे प्रेम समजून घ्यायला तयार नव्हतं. ज्यामुळे या प्रेमी जोडप्याला टोकाचं पाऊल उचलावं लागलं.

हा प्रकार उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आहे. येथे एक महिला आणि एक पुरूष रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तरीही डॉक्टर त्यांचा जिव वाचवू शकले नाहीत. या प्रकरणातील पुरुषाचे वय सुमारे 26 वर्षे आणि महिलेचे वय 22 वर्षे होते.

बरेलीच्या भोजीपुरा भागात लोकांना एक जिजा (भावोजी) आणि साली (मेहूणी) एकत्र बेशुद्ध अवस्थेत आढळले. दोघांनी विष घेतले असल्याचे लोकांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण त्याआधाीच दोघांचा मृत्यू झाला.

पोलीस अधिकारी म्हणाले की, "मृत व्यक्ती जवळच्या पीलीभीता जिल्ह्यातील रहिवासी होती आणि त्याच्यासोबत आसलेली ही महिला त्याच्या पत्नीची धाकटी बहीण होती. तपासात असे निष्पन्न झाले आहे की, त्या व्यक्तीचे त्याच्या मेहुण्यासोबत अफेअर होते."

पोलीस पुढे म्हणाले की, "दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पण त्याच्या कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. त्यांचा या नात्याला घरच्यांकडून कडाडून विरोध होता. यानंतर त्या दोघांनीही घरातून पळ काढला आणि नंतर विष खाल्ले."

अतिरिक्त एसपी (ग्रामीण) राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, डायल 112 वर मिळालेल्या माहितीनुसार, भोजीपुरा येथील सेन्थल रोडवर एक जोडपे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. पोलिसांनी या जोडप्याला रुग्णालयात नेले, तिथे त्यांचा मृत्यू झाला.

ते पुढे म्हणाले की, या दोघांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि नंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.