एकदा गुंतवा त्यानंतर दरमहा ठराविक रक्कम मिळवा, Post Office ची जबरदस्त स्कीम

उज्जवल भविष्यसाठी अनेक जण दीर्घकालीन किंवा कमी कालावधीसाठी गुंतवणूक (Investment) करतात.  

Updated: Sep 4, 2021, 04:55 PM IST
एकदा गुंतवा त्यानंतर दरमहा ठराविक रक्कम मिळवा, Post Office ची जबरदस्त स्कीम title=

मुंबई : चांगल्या भविष्यसाठी अनेक जण दीर्घकालीन किंवा कमी कालावधीसाठी गुंतवणूक (Investment) करतात. इतर योजनांमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कित्येक पटीने नफा होतो. मात्र नुकसान होण्याची शक्यताही तितकीच असते. मात्र पोस्ट ऑफीसातील गुंतवणूक ही नेहमीच सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेक जण विश्वास ठेवून पोस्टात गुंतवणूक करतात. पोस्टामार्फतही गुंतवणूकदारांसाठी एकसेएक भन्नाट योजना आणल्या जातात. ज्यामध्ये गुंतवणूकदाराला चांगला नफा मिळतो. पोस्टाची अशीच एक अशीच जबरदस्त योजना आहे. (indian post office monthly income schemes 2021 know details and interest rate)

काय आहे योजना?

पोस्टाच्या या योजनेचं पोस्ट ऑफीस मंथली इनकम स्कीम (Post Office MIS) असं नाव आहे. या योजनेचं मॅच्युरिटी कालावधी हा 5 वर्षाचा आहे. म्हणजेच 5 वर्षानंतर दरमहिन्याला एक ठराविक रक्कम मिळेल. या योजनेत कोण गुंतवणूक करु शकतो, कमीतकमी किती रक्कम गुंतवता येते, याबाबतची सर्व माहिती आपण जाणून घेऊयात.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी पोस्टात बचत खातं असणं बंधनकारक आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणि व्होटिंग कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायन्सन द्यावे लागेल. या योजनेचा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म ऑनलाईन डाऊनलोडही करता येईल. अर्ज करताना उत्तराधिकाऱ्याचं नावही टाकावं लागेल. तसेच खातं उघडण्यासाठी 1 हजार रुपये द्यावे लागतील.    

तसेच एमआयएस अकाउंट एका पोस्ट ऑफीसमधून दुसऱ्या पोस्टात ट्रान्सफर करता येऊ शकतं. या योजनेचा कालावधी हा 5 वर्षांचा आहे. मात्र त्यानंतरही योजनेचा कालावधी हा 5 वर्षांसाठी पुढे वाढवता  येतो. सर्वात म्हत्त्वाचं म्हणजे गुंतवणूकदाराने गुंतवलेली रक्कम ही सुरक्षित राहते. त्याबाबतची हमी केंद्र सरकार देते.  

गुंतवणूकदार पॉलिसी मॅच्युअर्ड होण्याआधी रक्कम काढू शकतात. मात्र या योजनेत गुंतवणुकीनंतर किमान 1 वर्षांचा कालावधी हा पूर्ण झालेला असवा. नियमांनुसार, 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान रक्कम काढण्यात आली, तर गुतंवलेल्या रक्कमेचे एकूण 2 टक्के कापून उर्वरित पैसे परत केली जातील. तसेच 3 वर्षांनंतर रक्कम काढायची असेल, तर एकूण रक्कमेपैकी 1 टक्के रक्कम कापून परत केली जाईल.  

पोस्टानुसार, या योजनेत वर्षाकाठी 6.6 इतका व्याज मिळतो. या योजनेत कोणीही भारतीय नागरिक गुंतवणूक करु शकतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 2-3 जण जॉईन्ट अकाउंट सुरु करु शकतात. तसेच या जॉईन्ट अकाऊंटचं रुपांतर हे वैयक्तिक खात्यातही करता येतं. हे असंच वैयक्तिक खात्याचं रुपांतर जॉईन्ट अकाउंटमध्ये करता येतं.

या योजनेत वैयक्तिक खातेधारक किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करु शकतो. तर जास्तीत जास्त 4 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करता येईल. तर गुंतवणूकीची हीच मर्यादा जॉईन्ट अकाऊंटसाठी 9 लाख रुपये इतकी आहे.