लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलीसमोर रडायचं नाटक...अन् पाठ फिरताच, पाहा काय घडलं

सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. 

Updated: Jul 22, 2022, 06:35 PM IST
लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलीसमोर रडायचं नाटक...अन् पाठ फिरताच, पाहा काय घडलं title=

मुंबई : सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नेहमीच हे व्हिडीओ मजेशीर असतील असं नाही. या व्हिडीओंपैकी काही व्हिडीओ हे भावूक करणारे असतात. मग लग्नातला सगळ्यात भावूक करणारा क्षण म्हणजे जेव्हा वधू आई-वडिलांचा निरोप घेतं आणि पतीसोबत तिच्या नवीन आयुष्याला सुर्वात करण्यासाठी निघते. त्या क्षणी वधूला तिचं घर तिचे आई-वडील आणि भाऊ-बहिण आठवतात. पण कोणत्याही मुलीसाठी सगळ्यात भावनिक क्षण हा तिच्या वडिलांपासून लांब जाणं हा असतो. खरंतर हा फक्त मुलीसाठी नाही तर तिच्या वडिलांसाठीही असतो. 

जेव्हा वधू तिच्या घरी जायला निघते तेव्हा ती केवळ आई-वडिलांनाच नव्हे तर भावंड आणि इतर नातेवाईकांनाही मिठी मारून रडते, कारण लग्नानंतर मुलगी दुसऱ्या घरची मुलगी होते, असे म्हणतात. सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये नववधू विदाईच्या वेळी आई-वडिलांना मिठी मारून रडत असते. तर दुसरीकडे हे पाहून आजूबाजूला उभे असलेले लोक भावूक होतात. यासगळ्यात असेही काही व्हिडीओ आहेत, ज्यात वधू न रडता निघून जाते. मात्र, इंटरनेटवर आता विदाईचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय जो व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू फुटेल. 

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, लग्नानंतर विदाईचं वातावरण आहे आणि मग अचानक नवरीने वडिलांना पाहून मिठी मारली. यावेळी वधू खूप भावूक झाली असून ती वडिलांच्या छातीवर डोके ठेवून रडते. यावेळी तिचे वडिलही आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून भावूक होण्याचा अभिनय करत आहे. नंतर, नववधू वळताच तिचे वडील मागून दोन्ही हात वर करून नाचू लागतात. वधूच्या वडिलांना पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले.

सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नववधू निघू लागताच वडील मस्त नाचू लागतात आणि जवळ उभे असलेले पाहुणे हसायला लागतात. वधू मागे वळून पाहताच तिचे वडील पुन्हा भावूक होण्याचा अभिनय करू लागतात. अवघ्या 20 सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. @SabjiHunter नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 15 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. ४६ हजार पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तर साडे सात हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे.