Retail Inflation: सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका; खाद्यपदार्थ महागणार?; समोर आलं महत्त्वाचं कारण

Inflation Rate in India: सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली आहे. 

Updated: Oct 13, 2022, 08:50 AM IST
Retail Inflation: सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका; खाद्यपदार्थ महागणार?; समोर आलं महत्त्वाचं कारण title=

Reserve Bank of India : गेल्या दोन वर्षांपासून कोविड महामारीमुळे (Covid19) सर्वसामान्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातच आता सरकारने बुधवारी किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. परिणामी सप्टेंबरमध्ये महागाईचा दर 7.41 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या पाच महिन्यांतील हा उच्चांक आहे. विशेष बाब म्हणजे चलनवाढीचा (Inflation Rate) दर सलग 9व्यांदा सेंट्रल बँकेने (RBI) निश्चित केलेल्या 2 ते 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या वर राहिला आहे.

केंद्र सरकारला अहवाल द्यावा लागेल

यापूर्वी, किरकोळ महागाईचा आकडा ऑगस्टमध्ये 7 टक्के आणि सप्टेंबर 2021 मध्ये 4.35 टक्के होता. ऑगस्टमधील 7.62 टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई (Food inflation) 8.60 टक्क्यांवर पोहोचली. महागाई 6 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास आरबीआयला (RBI) केंद्र सरकारला अहवाल सादर करावा लागेल. या अहवालात रिझर्व्ह बँकेला किरकोळ चलनवाढ दोन ते सहा टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यास ते का अपयशी ठरले हे स्पष्ट करावे लागेल.

आयातित चलनवाढीचा दबाव कमी

किरकोळ महागाई 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान राहील याची खात्री करण्यासाठी केंद्राने आरबीआयला (RBI) सांगितले आहे. यापूर्वी, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आयातित चलनवाढीचा दबाव कमी झाला आहे.

वाचा : Petrol-Diesel आता स्वस्त होणार!; मोदी सरकारचा मोठा निर्णय

अमेरिकातील घाऊक महागाई 8.5 टक्के

दुसरीकडे, अमेरिकेतील घाऊक चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर 8.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र, मागील महिन्याच्या तुलनेत महागाई कमी झाली आहे. तोच ऑगस्टमध्ये 8.7 टक्के होता. कामगार विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात उत्पादकांच्या किंमत निर्देशांकात 0.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी दोन महिन्यांसाठी ते खाली आले होते.

उत्पादक किंमत निर्देशांक ग्राहकांपर्यंत माल पोहोचण्यापूर्वी किंमतीतील बदल मोजतो. सप्टेंबरमधील दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे हॉटेलच्या खोलीच्या भाड्यात झालेली वाढ. सलग दोन महिन्यांच्या घसरणीनंतर ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढल्या आहेत.