१२ वर्षाच्या मुलीचा जीव वाचण्यासाठी आई लढली बिबट्याशी

आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी एक आई थेट बिबट्यासोबत भिडली. ही घटना उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील आहे. 

Updated: Mar 1, 2018, 07:53 PM IST
१२ वर्षाच्या मुलीचा जीव वाचण्यासाठी आई लढली बिबट्याशी title=

उत्तर प्रदेश : आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी एक आई थेट बिबट्यासोबत भिडली. ही घटना उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील आहे. 

मुलगी गंभीर जखमी

इथे कतर्नियाघाट अभयारण्यात सिंधू नावाची महिला आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी बिबट्याशी लढली. महिलेची ओरड ऎकून आजूबाजूचे लोक तिथे आले आणि बिबट्या पळाला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. उपचारासाठी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

लग्नासाठी आली होती सिंधू

ही घट्ना कतर्नियाघाट अभयारण्याच्या सुजौली रेंजच्या जंगलाजवळील बनकटी समपुरवा गावातील आहे. आझमगढची सिंधू इथे आपल्या भावाच्या लग्नासाठी आली होती. बुधवारी सकाळी ती तिच्या १२ वर्षीय खुशबू या मुलीला घेऊन शौचालयासाठी शेतात गेली होती. मुलीला पाहून बिबट्याने मुलीवर झडप घेतली. सिंधूने सांगितले की, मुलीवर बिबट्याने हल्ला करताच मी माझ्या जीवाची पर्वा न करता बिबट्याला घट्ट पकडून ठेवले आणि ओरडत राहिले. 

साधारण सात मिनिटे बिबट्याशी लढली

सिंधूने सांगितले की, साधारण ५ ते ७ मिनिटे ती बिबट्यासोबत लढत होती. काही वेळाने गावातील लोक आवाजाने आले. तेव्हा बिबट्या पळून गेला. मुलगी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे.