सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी साजरी केली धुळवड

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 1, 2018, 07:23 PM IST
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी साजरी केली धुळवड  title=

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केली. 

जम्मूजवळ असलेल्या भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सध्या सातत्याने पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरू आहे. त्याला भारतीय सैनिकही तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत. 

मात्र होळीच्या दिवशी सीमा सुरक्षा दलाच्या तळावर थोडी उसंत या जवानांना मिळाली. तळहातावर शीर घेऊन मायभूमीचं प्राणपणाने रक्षण करणाऱ्या या शूरवीरांना होळी सणाच्या आनंदाने थोडाफार दिलासा मिळाला.

एकमेकांना रंग लावून आणि मिठाई देऊन या शूरवीरांनी धुळवड साजरी केली. भारत मातेच्या जयजयकाराची साथ त्याला लाभली. जवान, अधिकारी सगळेच होळीच्या रंगात आणि आनंदात न्हाऊन निघाले.