बाजारात मुलाचा हात सोडला आणि असा प्रकार घडला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

खरेदी करताना नकळत पणे त्यांचं लक्ष आपल्या मुलांवरुन हटतं आणि याच संधीचा फायदा घेऊन हे चिमुकले इकडे तिकडे पळू लागतात. 

Updated: Feb 23, 2022, 09:53 PM IST
बाजारात मुलाचा हात सोडला आणि असा प्रकार घडला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ title=

मुंबई : बरेच पालक आपल्या लहान मुलांना बाजारात खरेदी करायला बाहेर घेऊन जातात. तेव्हा खरेदी करताना नकळत पणे त्यांचं लक्ष आपल्या मुलांवरुन हटतं आणि याच संधीचा फायदा घेऊन हे चिमुकले इकडे तिकडे पळू लागतात. किती झालं तरी लहान मुलंच ती, त्यामुळे खोडकरपणा तर ते करणारच. हे करत असताना काय चांगलं काय वाईट हे त्यांना माहित नसतं. त्यामुळे पालकांनी आपल्या  मुलाकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. असाच प्रकार एका चिमुकल्यासोबत घडला. जो पाहून तुमच्या हृदयाचं पाणी होईल.

सोशल मीडिया हे असं माध्यम आहे. जेथे आपल्याला काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ ही मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ हे आपल्याला शिकवतात. ज्यामुळे आपण तशी चुक पुन्हा करणार नाही.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ प्रत्येक पालकांसाठी आहे. जे आपल्या मुलाला घेऊन बाजारात जातात.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता, येथे एक मुलगा रस्त्याच्या कडेला खेळत होता. परंतु त्याच्या वडिलांचं लक्ष नव्हतं, तेव्हा तो थेट धावत रस्त्यावर आला. त्याच वेळेला रस्त्यावरुन एक भरधाव ट्रक येत होता. मात्र या मुलाचं नशीब चांगलं होतं की, फक्त एक सेकंदाच्या फरकानं त्याचा जीव वाचला.

हा मुलगा जेव्हा रस्त्यावर पळू लागला, ही गोष्ट नशीबाने त्याच्या वडिलांच्या लक्षात आली आणि ते देखील या चिमुकल्याच्या मागे धावले आणि त्यांनी या मुलाला पकडं, परंतु समोरुन जो ट्रक येत होता, त्या ट्रकच्या हा मुलगा किती जवळ आला होता. हे पाहून तुमच्या ही काळजाचं पाणी होईल. परंतु त्या ट्रक ड्रायव्हरने वेळेवल लावलेल्या ब्रेकमुळे आणि वडिलांनी दाखवलेल्या चपळाईमुळे त्या मुलाचे प्राण वाचले आहे.

ही घटना रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, त्या सर्वांनाच हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे, ज्यामुळे सर्व युजर्स देखील आपल्या जवळच्या व्यक्तींना मुलं आहे. त्यांना शेअर केलं आहे.

तुम्हाला देखील लहान मुल असतील, तर शहाणे व्हा आणि शक्यतो त्यांच्याकडून दुर्लक्ष होईल, अशा ठिकाणी त्यांना घेऊन जाणं टाळा. तसेच मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष द्या.