कच्चा बदामपेक्षाही हे गाणं डेंजर! पाहा तुम्हाला तरी ओळखता येतंय का?

कच्चा बदाम हे गाणं कदाचित तुम्हाला समजलं असेल पण आता हे बघा तुम्हाला समजतंय का? भलेभले झाले फेल...

Updated: Feb 23, 2022, 08:46 PM IST
कच्चा बदामपेक्षाही हे गाणं डेंजर! पाहा तुम्हाला तरी ओळखता येतंय का?  title=

मुंबई : सोशल मीडियावर वेगवेगळ्या ट्रेंडचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या कच्चा बदाम हे गाणं खूप जास्त लोकप्रिय ठरलं आहे. त्याचे रिल्स देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शेंगदाणे विकणाऱ्या व्यक्तीचं हे गाणं संगीतबद्ध झालं आणि तो रातोरात स्टार बनला. 

कच्चा बदामनंतर आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पेरू विकताना दिसत आहे. तो हटके स्टाईलनं पेरू विकत आहे. तो नेमकं काय गाणं म्हणतोय हे समजत नसलं तरी त्याची स्टाईल मात्र फेमस झाली आहे. 

सोशल मीडियावर या या व्यक्तीची पेरू विकण्याची हटके स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आता हे गाणंही ट्रेंड होणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. त्याची पेरू विकण्याची हटके स्टाईल सोशल मीडियावर युजर्सना आवडली आहे. 

अनेकांनी याचे रिल्स बनवायला घ्या असंही कमेंटमध्ये म्हटलं आहे. हा पेरू विकणारा कोण आहे? हा व्हिडीओ कुठला आहे याची सध्या तरी कोणतीही माहिती समोर आली नाही.