Budget 2023: बजेटनंतर शेअर मार्केटमधून मोठी अपडेट! सेन्सेक्समध्ये उसळी? पाहा काय सांगतायेत आकडे...

बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये मोठी अपडेट दिसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटनंतरच्या शेअर मार्केटमध्ये लागले आहे. 

Updated: Feb 1, 2023, 08:06 PM IST
Budget 2023: बजेटनंतर शेअर मार्केटमधून मोठी अपडेट! सेन्सेक्समध्ये उसळी? पाहा काय सांगतायेत आकडे...  title=

Share Market and Budget 2023: बजेटच्या पाठोपाठचं आता शेअर मार्केटमध्येही (Share Market Rise) मोठी उसळी आली आहे. सेन्सेक्स हा 1,000 अंकानी वाढला आहे. तर निफ्टी 17,900 च्यावर वधारला आहे. त्यामुळे शेअर मार्केटमधील हा बदल पाहून गुंतणूकदारांचे (Investors) लक्ष हे येत्या बजेटकडे लागले आहे. सध्या बॅंकिग क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. शेअरम मार्केटसाठीही सध्या या क्षेत्रात चांगले दिवस आले आहेत. आता शेअरमार्कटच्या काही लोकप्रिय शेअर्समध्येही (Share Market Update) घट झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातून बॅंकिग क्षेत्रातील शेअर्समध्येही चढ-उतार पाहायला मिळतो आहे. सोबतच आयटीपेक्षाही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आज मात्र शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावर चढला आणि सोबतच घसरलाही? (Bounce in stock market after budget, Sensex climbed 980 points to reach 60534)

सध्याच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्समध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. यामध्ये आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टायटन आणि एनटीपीसी यांचा समावेश होता. ज्यांनी मोठा नफा मिळवला. तर आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट आणि लार्सन अँड टुब्रो हे मागे राहिले. त्यांना मोठ्या प्रमाणात (Adani) तोटा झाला. 

येत्या दिवसात दोन मोठे बदल पाहायला मिळाले. बजेट संपल्यानंतर सेन्सेक्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर काही तासांनीच शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावर घसरला. यामुळे सकाळी गुंतवणूकदारांचे लागलेले लक्ष दुपारी पुन्हा सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीकडे (Nifty) वळले. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी निराशा असलेली पाहायला मिळाली. निफ्टी मोठ्या अंकांनी घसरला तर त्यातून सेन्सेक्स हा फ्लॅच राहत तिथेच स्थिरावला. यामुळे या दिवसात एक मोठा बदलही पाहायला मिळाला. 

मागच्या वर्षीही शेअर मार्केट कितपत सुधारेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे कारण सध्या सुरू असलेल्या अदानी-हिंडनबर्ग प्रकरणामुळे सगळीकडेच मोठ्या प्रमाणात गुंतागुंत सुरू आहे. त्यातून यंदाचे बजेटही 2024 च्या निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून देण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मोठे बदलही पाहायला मिळाले. त्यातून सात लाखांवरील उत्पन्नावरही करमुक्ती (Tax Free) देण्यात आली त्यामुळे सध्या सगळीकडेच विविध चर्चांना उधाण आले आहे. 

सध्याच्या बजेटमध्ये अनेक गोष्टी महागल्या आणि स्वस्तही झाल्या त्यामुळे सध्या सगळ्यांचेच लक्ष्य हे येत्या बजेटकडे लागले होते.