पाकिस्तानकडून गोळीबार, औरंगाबादचे सुपूत्र किरण थोरात यांना वीरमरण

जम्मू-काश्मिरात पूंछ व राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन  

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 12, 2018, 10:08 AM IST
पाकिस्तानकडून गोळीबार, औरंगाबादचे सुपूत्र किरण थोरात यांना वीरमरण  title=

काश्मीर : जम्मू-काश्मिरात पूंछ व राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बुधवारी भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. यात औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र किरण थोरात यांना वीरमरण आले. लष्कराच्या प्रवक्त्याने बुधवारी रात्री उशिरा याबाबत माहिती दिली. थोरात हे वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी येथील रहिवासी होते. कृष्णा घाटी सेक्टरमधील चकमकीत मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे किरण थोरात गंभीर जखमी झाले. उपचारांदरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, याआधीही पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर सुंदरबनी सेक्टरजवळ गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले होते. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत. रायफलमॅन विनोद सिंह आणि जकी शर्मा अशी शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत. भारतीय लष्करानही गोळीबाराला जशाच तसं उत्तर दिले. सुंदरबनी सेक्टरजवळील भारतीय चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने टार्गेट केले होते.