नवी दिल्ली : क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी भारतीय लष्कारची सेवा बजावत आहे. लष्कराच्या सेवेत असताना काश्मीरमध्ये काही तरुणांनी धोनीसमोर ‘बूम बूम आफ्रिदी’ अशा घोषणा दिल्यात, अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘बूम बूम' घोषणा देणारा हा व्हिडिओ पाकिस्तानमधील काही वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे. टीव्ही चॅनेल्सनी काश्मिरी तरुणांच्या हृद्यात धोनी नाही तर आफ्रिदी अशा आशयाखाली प्रकाशित केला आहे.
महेंद्रसिंग धोनी लष्कारची सेवा बजावण्यासाठी काश्मीर येथे रुजू झाला आहे. लेफ्टनंट कर्नल असणाऱ्या धोनीची नियुक्त काश्मीरमधील १०६ टीए बटालियनमध्ये (पॅरा) करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसाठी लागू असणारे अनुच्छेद ३७० रद्द केले. त्यानंतर काश्मीरमधील वातावरण तणावपूर्ण शांत आहे. अशा वातावरणात धोनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काश्मीरमधील काही तरुणांनी धोनीसमोर ‘बूम बूम आफ्रिदी’ अशी घोषणाबाजी केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दाखवला आहे.
मला भारतीय लष्कराची सेवा करायची आहे. त्यामुळे दोन महिने विश्रांती द्यावी, अशी मागणी धोनीने क्रिकेट नियामक मंडळाकडे केली होती. याची दखल घेत त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर धोनी भारतीय सैन्यदलात रुजू झाला आहे. धोनीच्या या निर्णयाचे सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे. त्याच्या अनेक चाहत्यांना धोनी सैन्याच्या छावणीमध्ये काय काय करतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
Crowd started chanting Boom Boom Afridi when Dhoni reached Kashmir.. What a sight @SAfridiOfficial #Cricket #PakistanZindabad pic.twitter.com/7gCabGzoy1
— Mohammed Faizan Najeeb (@danawalafaizan) August 7, 2019
सध्या धोनीबाबत एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. धोनी बारामुला येथील लष्करी छावणीमध्ये गेला असता त्याला पाहण्यासाठी तेथे स्थानिक तरुणांनी मोठी गर्दी केली होती. धोनी या ठिकाणी आल्यावर गाडीमधून उतरुन छावणीकडे जात असताना येथे जमलेल्या तरुणांनी पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या नावाने घोषणाबाजी केली. ‘बूम बूम आफ्रिदी… बूम बूम आफ्रिदी..’