विधानसभा निवडणूक: सट्टाबाजारात कोणाला पंसती?

कोणाचं सरकार येणार?

Updated: Nov 27, 2018, 05:07 PM IST
विधानसभा निवडणूक: सट्टाबाजारात कोणाला पंसती? title=

नवी दिल्ली : 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही विधानसभा निवडणूक फार महत्त्वाची मानली जात आहे. कोणाला वाटतं काँग्रेस भाजपला पराभूत करेल तर कोणाला वाटतं भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल. सगळ्यात जास्त 3 मोठ्या राज्यांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. जेथे भाजपची सत्ता आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड.

सट्टाबाजारात तेजी

या 3 राज्यांच्या निवडणुकीमुळे सट्टा बाजार देखील चांगलाच गरम आहे. राज्यातील मतदार ज्या पक्षाच्या बाजुने बोलतात तसे सट्टा लावणारे देखील भाव बदलतात. करोडोंचा बाजार या निवडणुकीदरम्यान खेळला जाणार आहे. सट्टाबाजारात सध्या भाजपसाठी वाईट बातमी आहे. कारण सट्टाबाजारात राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येईल असं म्हटलं जात आहे तर छत्तीसगडमध्ये देखील भाजप फार कमी अंतराने विजयी होईल असं म्हटलं जात आहे. 

मध्यप्रदेश

सट्टा बाजारात मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 230 पैकी 117 ते 118 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 100 ते 102 जागा मिळण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसचं सरकार येईल अशी सट्टेबाजारात चर्चा आहे. मध्य प्रदेशातील अनेक मोठे मंत्री यंदा पराभूत होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, एक महिन्याआधी सट्टेबाजारात भाजप पुढे होता पण मतदान जवळ येताच काँग्रेस पुढे जात असल्याचं चित्र आहे. 1 महिन्यापूर्वी भाजपला 130 जागा तर काँग्रेसला 100 जागा मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती.

राजस्थान

राजस्थान निवडणुकीबाबत आलेल्या प्रत्येक पोलमध्ये काँग्रेसची सरकार बनण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे राजस्थानमधील पोलमुळे काँग्रेस पक्षात आनंद आहे. सट्टाबाजारानुसार 200 पैकी 127 ते 129 जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे तर 54-56 जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मतदारसंघात देखील मोठी चुरस आहे. 

छत्तीसगड

या राज्यात मतदान झालं असून उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद झालं आहे. निकालाबाबत सट्टाबाजारात देखील साशंकता आहे. भाजपची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये रमन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. पण तरीही रोजगार, विकासच्या बाबतीत भाजपला येथे थोडा धक्का बसण्याची चिन्ह आहेत. 90 पैकी येथे भाजपला 43 ते 45 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला 38 ते 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप फक्त 5 जागांनी पुढे आहे.