मुंबई : एलपीजीच्या (LPG Cylinder) किंमती आकाशाला भिडत आहेत. या महिन्यात LPG Cylinder ला 10 रुपयांची कपात झाली आहे, तरीही तेल कंपन्या दिलासा देतील की नाही, हे काही सांगता येत नाही. पण एक गोष्ट आशी आहे, ज्यामुळे तुमचा तणाव नक्कीच कमी होईल. आता एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सऍपवर मेसेज करुन आपला सिलेंडर बुक करू शकता.
तेल कंपन्यांनी व्हॉट्सऍपच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) बुक करण्यासाठी स्वतःचे नंबर जाहीर केले आहेत. आपल्याला हे क्रमांकावर फक्त REFILL टाइप करुन पाठवावे लागतील.
व्हॉट्सअॅपच्या मदतीने बुकिंग केल्यावर तुम्हाला एलपीजी सिलिंडरचा स्टेटसही मिळू शकेल. Indane Gas आणि HP गॅस दोघेही व्हॉट्स अॅपद्वारे एलपीजी बुकिंग सेवा देत आहेत. तुम्हाला हे गॅस सिलेंडर व्हॉट्सऍपवर कसे बुक करू शकता हे आम्ही सांगणार आहोत.
Indane चे ग्राहक 7718955555 वर कॉल करून त्यांचे सिलिंडर बुक करू शकतात. याशिवाय व्हॉट्सऍपवर तुम्हाला गॅस बुक करायचा असेल तर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 7588888824 वर 'REFILL' लिहून तुम्हाला मॅसेज करावा लागेल. हा नंबर आपल्या मोबाईल फोनवर सेव्ह करुन ठेवा. कारण बुकिंगशी संबंधित प्रत्येक माहिती या नंबरवर तुम्हाला मिळेल.
बुकिंग केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सऍपवर स्टेटस देखील तपासू शकता. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून STATUS # टाइप करा. यानंतर, बुकिंगनंतर तुम्हाला ऑर्डर नंबर मिळेल तो ऑर्डर नंबर टाका.
समजा तुमचा बुकिंग क्रमांक 12345 आहे, तर तुम्हाला STATUS # 12345 टाइप करुन 7588888824 या व्हाट्सऍप क्रमांकावर मेसेज पाठवावा. हे लक्षात ठेवा की STATUS # आणि ऑर्डर क्रमांकांच्यामध्ये कोणताही SPACE द्यायचा नाही.
तुम्हाला HP गॅस सिलेंडर बुक करायचे असल्यास 9222201122 या क्रमांकांवर व्हॉट्सऍप करा. या नंबरवर तुम्हाला BOOK टाइप करावे लागेल आणि वरील क्रमांकावर पाठवावे लागेल. तुम्हाला काही संबंधित माहिती विचारली जाईल. ती माहिती तुम्हाला भरावी लागेल, आणि आपले सिलिंडर बुक केले जाईल. या नंबरवर तुम्हाला इतर बर्याच सेवांबद्दल माहिती देखील मिळू शकते. जसे की, तुम्ही तुमचा एलपीजी कोटा, एलपीजी आयडी, एलपीजी सबसिडी इत्यादीबद्दल देखील जाणून घेऊ शकता.
यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 1800224344 या क्रमांकाला सेव्ह करावे लागेल. त्यानंतर त्यावर BOOK किंवा 1 टाइप करुन व्हॉट्सऍप करा. यानंतर, आपले सिलिंडर बुक होईल आणि आपल्या व्हाट्सऍपवर एक कन्फर्मेशन मॅसेज येईल. तो मॅसेज आला म्हणजे तुमचा सिलिंडर बुक झाला आहे.