पावसाचं थैमान: पुरात तरुण वाहून गेला

बेगळाव जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसानं आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेलाय. तर एकाचा जीव वाचवण्यात यश आलंय. भूतरामहट्टी जवळ पुणे बंगळुरु राष्ट्रीय महारमार्गावर काल संध्याकाली ही घटना घडली.

Updated: Jun 3, 2018, 01:39 PM IST

बेगळाव : बेगळाव जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसानं आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेलाय. तर एकाचा जीव वाचवण्यात यश आलंय. भूतरामहट्टी जवळ पुणे बंगळुरु राष्ट्रीय महारमार्गावर काल संध्याकाली ही घटना घडली.

इम्रान नदाफ असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव असून तो कोटगेरी तालुक्यातील हुक्केरीचा रहिवासी आहे. इम्रान आणि त्याचा भाऊ दुचाकीवरुन बेळगावच्या दिशेनं येत होते. पाऊस पडत असल्यानं त्यांनी सर्व्हिसरोडवरुन दुचाकी घेतली. मात्र, सर्व्हीस रोडवरील चरीत पाण्याचा जोरदार प्रवाह आल्यानं इम्रान पाण्यात वाहून गेला तर त्याचा भाऊ बचावला.