नवी दिल्ली : वेगवेगळ्या राज्यांमध्ये 11 जागांवर झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळाला आहे. गुरुवारी आलेल्या निकालांमध्ये उत्तराखंडच्या थराली सीटवर भाजपला विजय मिऴाला आहे. ही जागा सोडली इतर सर्व जागांवर भाजप आणि मित्रपक्षांचा पराभव झाला आहे. थराली सीटवर भाजपच्या मुन्नी देवी यांनी काँग्रेसच्या जीत राम टम्टा यांना 1900 मतांना पराभूत केलं आहे.
सोमवारी देशातील 4 लोकसभेच्या जागांवर आणि 10 विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी या निवडणुका होत असल्याने त्याकडे गांभीर्याने पाहिसलं जात होतं. यूपीमधील कैराना, महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया आणि पालघर तर नगालँडमध्ये एका जागेवर लोकसभेची ही पोटनिवडणूक झाली. विधानसभेच्या पलुस कादेगांव(महाराष्ट्र), नूरपूर(उप्र), जोकीहाट(बिहार), गोमिया व सिल्ली (झारखंड), चेंगानूर (केरळ), अंपती (मेघालय), शाहकोट (पंजाब), थराली (उत्तराखंड) आणि मेहेशतला (पश्चिम बंगाल) या जागांवर पोटनिवडणूक झाली. 31 मेला या सर्व जागांचा निकाला आला.