मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसमोर मला शिवागाळ केली- माजी मुख्यमंत्री मांझी

माजी मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Updated: May 31, 2018, 03:51 PM IST
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसमोर मला शिवागाळ केली- माजी मुख्यमंत्री मांझी title=

नवी दिल्ली : आरजेडीकडून आयोजित गरीब महासंमेलन कार्यक्रमासाठी आरा पोहोचलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी शिवी दिल्याचा आरोप केला आहे. मांझी यांनी आरोप केला आहे की, नीतीश कुमार यांनी सर्व एक्साइज कमिश्नर यांच्या बैठकीत बोलवून मला शिवीगाळ केली. त्यांनी अधिकाऱ्यांना म्हटलं की, मांझी यांनी हा आरोप केला आहे की, दारुबंदी कायद्याच्या अंतर्गत फक्त दलितांना त्रास दिला जात आहे. या आरोपामध्ये किती सत्य आहे.?'

मांझी यांनी म्हटलं की, मी नीतीश कुमार यांना सुरुवातीला याबाबत इशारा दिला होता की दारुबंदी एक काळा कायदा आहे. यामुळे गरीब, दलितांचं नुकसान होईल. दारुबंदीमुळे बिहारचे पोलीस कोट्याधीश होत आहे.

दूसरीकडे जगदीशपूरचे आरजेडी आमदार रामविशुन सिंह लोहिया यांनी आरएसएस आणि केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, देशात सुप्रीम कोर्टा आणि हायकोर्टामध्ये 581 जज आहेत त्यापैखी फक्त 33 जज दलित आहेत. अशात गरिबांना न्याय कसा मिळेल. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांमध्ये जोपर्यंत दलितांना आरक्षण नाही दिलं जात तोपर्यंत न्याय मिळणं शक्य नाही.