Bater Farming in India: देशाच्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी सर्वात जास्त कुक्कुटपालनाचा (Poultry farming) व्यवसाय करतात. मात्र फार कमी लोकांना कल्पना असेल की, देशाच्या ग्रामीण भागांमध्ये आणि जंगलाच्या क्षेत्रात एक असा पक्षी (Bird) आहे, ज्याचा पोल्ट्री फार्मिंगसाठी वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. हा पक्षामध्ये वर्षाला 300 अंडी देण्याची क्षमता असते. या पक्षाला तीतर (Quail) किंवा बटेर असं म्हटलं जातं.
तीतर हा एक जंगली पक्षी आहे. याचं मांस चवीला खूप उत्कृष्ट लागतं. लोकं फार आवडीने यांच्या मासाचं सेवन करतात. सध्याच्या काळात या पक्षाची संख्या फार कमी होताना दिसतेय. त्यामुळे भारत सरकारने त्याच्या शिकारी संदर्भात बंदी आणली आहे. त्यामुळे जर तुम्ही तीतर पाळायचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठी सरकारकडून लायसन्स काढावं लागणार आहे.
हा पक्षी त्याच्या जन्माच्या 45 ते 50 दिवसांमध्ये अंडी देण्यास सुरुवात करतो. या पक्षासंदर्भात व्यवसाय सुरु करायचा असेल तर फार कमी वेळामध्ये सुरु करता येतो. सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत देखील करत. यामुळे तितर पक्षाची संख्या वाढण्यास मदत होते. याचा दुसरा फायदा म्हणजे यामुळे शेतकऱ्यांचा नफाही वाढतो.
बटेर पालन तुम्हाला 20 हजारामध्ये तुम्हाला 3 हजार पिल्लं मिळतात. यामध्ये एक लहान पक्षी 40-60 रुपयांना विकला जातो, याचा अर्थ एक लहान पक्षी सरासरी 50 रुपयांना विकला जातो. अशा प्रकारे एकाच वेळी 50 हजार रुपये गुंतवून जवळपास 1.5 लाख कमवू शकता. जर तुम्ही 4-5 मध्ये स्वच्छता ठेवून नवीन पिल्लं आणलीत तर तुम्ही वर्षातून 8 वेळा लहान पक्ष्यांची पिल्लं आणू शकाल. त्यांची वाढ करून विक्री केल्याने दरवर्षी तुम्हाला फक्त 8 लाख रुपयांचा नफा मिळेल.
तीतर हा पक्षी आकाराने छोटा असतो. शिवाय त्याचं वनजनंही कमी असतं. त्यामुळे त्याच्या पालनासाठी जागाही कमी लागतेय. याचा परिणाम व्यवसायातील गुंतवणूकीवरही होतो. त्यामुळे याची गुंतवणूक खूपच कमी आहे. केवळ 4-5 तीतरांचं पालन केल्यावर या बिझनेसला सुरुवात करू शकतो. बाजारामध्ये यांचं मांस चिकनच्या तुलनेत चांगल्या किंमतीत विकलं जातं. त्यामुळे तुम्ही या पक्षाबाबत चांगला व्यवसाय करू शकता.
पोषक तत्वांचं प्रमाण भरपूर
तीतरच्या अंड्याचा रंग हा रंगीबेरंगी असतो. यामध्ये कॉर्बोहाइड्रेट, प्रोटीन, वसा तसंच भरपूर प्रमाणा मिनिरल्स असतात. प्रति ग्राम अंड्यातील पिवळ बलकामध्ये 15 ते 23 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल आढळून येतं. अनेक प्रकारच्या आजारांमध्ये या पक्षाच्या अंड्यांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.