केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत; अमित शहांचा चेन्नई दौरा रद्द

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मिळत असून, अनेक मंत्र्यांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे. तसेच, काही नव्या चेहऱ्यांनाही मोदी मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीत रंगली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 21, 2017, 04:56 PM IST
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत; अमित शहांचा चेन्नई दौरा रद्द title=

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मिळत असून, अनेक मंत्र्यांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे. तसेच, काही नव्या चेहऱ्यांनाही मोदी मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीत रंगली आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या चेहऱ्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच, जुन्या चेहऱ्यांच्या कामकाजाचा आढाव घेण्यासाठी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आपला चेन्नई दौराही रद्द केल्याचे वृत्त आहे. नव्या चेहऱ्यांसाठी मोदी शहा टीम राज्यमंत्र्यांशी एकएकट्याला घेऊन चर्चा करत आहे. अमित शाह, राजीव प्रताप रूढी आणि उपेंद्र कुशवाहा हे तीन नेते राज्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेत असल्याचेही वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

प्राप्त माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नवे दोस्त नितीश कुमार यांनाही दिल्लीला बोलावण्यात आले आहे. त्यामुळे मंत्रिंडळात नितीश यांच्या जनता दलालाही संधी मिळण्याची शक्यात वाढली आहे.