गोरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपा खासदाराचा राजीनामा

गोरक्षेच्या मुद्द्यावर मला कोणी सहकार्य करत नसल्याचा आरोप राजा सिंह यांनी भाजपावर केला

Updated: Aug 13, 2018, 10:11 AM IST
गोरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपा खासदाराचा राजीनामा  title=

हैदराबाद : आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे तेलंगणाचे खासदार टी राजा सिंह लोध यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिलायं. ते गोशमहल विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात.  मी भारतीय जनता पार्टी (भाजपा) कडे राजीनामा सोपावल्याचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर शेअर केला. माझ्यामुळे भाजपा कोणत्या अडचणीत येऊ नये असं मला वाटतं असं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय.

'भाजपाकडून साथ नाही'

गोरक्षेच्या मुद्द्यावर मला कोणी सहकार्य करत नसल्याचा आरोप राजा सिंह यांनी भाजपावर केला होता. 'तेलंगणामध्ये गोहत्या बंद व्हायला हवी, आम्हाला तिथे कोणतीच गडबड नकोय' असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय. रस्त्यावर उतरून गोहत्येवर बंदी आणू अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली. माझ्यासाठी हिंदू धर्म आणि गोरक्षा हे पहिलं येत, त्यानंतर राजकारण येतं असं राजा सिंह म्हणाले. मी भाजपाच्या पदाचा राजीनामा दिलायं. मी खूपवेळा हा प्रश्न संसदेत आणलायं पण पार्टीकडून मला काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

भाजपाशी संबंध नाही

मी यापुढे जे काही काम करेन त्याचा संबंध भाजपाशी लावू नका असेही त्यांनी मीडियाला सांगितले. राजा सिंह हे आपल्या विधानांसाठी ओळखले जातात. त्यामुळे या व्हिडिओनंतरही ते पुन्हा चर्चेत आले आहेत.