बंगालमध्ये भाजपला धक्का, या नेत्याची तृणमुल काँग्रेसमध्ये घरवापसी

बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला आणखी एक झटका

Updated: Jun 11, 2021, 05:23 PM IST
बंगालमध्ये भाजपला धक्का, या नेत्याची तृणमुल काँग्रेसमध्ये घरवापसी title=

कोलकाता : बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला मोठा झटका लागला आहे. राज्यातील भाजपचे मोठे नेते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी भाजपचा साथ सोडली आहे. त्यांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी त्यांचं स्वागत केलं. मुकुल रॉय (Mukul Roy) यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि माजी आमदार शुभ्रांशु रॉय (Shubranshu roy) देखील तृणमूलमध्ये शामिल झाले आहेत.

निवडणूक निकालानंतर मुकुल रॉय यांच्या घरवापसीची चर्चा होती. काही दिवसांपासून ते भाजपपासून लांबच होते. मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांचे खास मानले जायचे. पण नंतपर मतभेदानंतर सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी तृणमूलमधून राजीनामा दिला होता. त्यानतंर ते भाजपमध्ये आले होते. विधानसभा निवडणुकीत ते नदियाच्या कृष्णानगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. ते विजयी देखील झाले पण त्यांचा मुलगा शुभ्रांशु बीजपूरमधून पराभूत झाला.

तृणमूलमध्ये प्रवेशाआधी त्यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. भाजपमध्ये आलेले अनेक जण पुन्हा तृणमूलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं देखील समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार बंगाल भाजपमध्ये सुवेंदु अधिकारी यांचं वजन वाढत आहे. त्यांना विरोधी पक्ष नेता देखील बनवलं गेलं आहे. त्यामुळे मुकुल रॉय हे अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा टीएमसीमध्ये प्रवेश केला.