नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (BJP) आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्य़ात येत आहे. आज भाजपने खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे मोदी सरकार आज राज्यसभेत कोणतं विधेयक आणणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. बजेट सत्रातील आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी ४ वाजेच्या आधी अर्थमंत्री निर्मला सीतारामण या बजेट संबंधित प्रश्नावर उत्तर देणार आहेत.
भाजपने तीन लाईनचा व्हिप जारी करत खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. त्यामुळे भाजप कोणतं मोठं बिल संसदेत सादर करणार आहे याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत. किंवा बजेटवर निर्मला सीतारामण यांच्या उत्तरावर समर्थन देण्यासाठी खासदारांना उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. हे काही वेळेतच स्पष्ट होईल.
BJP's letter states 'All BJP MPs of Rajya Sabha are informed that some very important Legislative work will be brought to the House on Tuesday, 11th February 2020, to be discussed and to be passed'. https://t.co/kQ03pFZ69k
— ANI (@ANI) February 10, 2020
या बजेट सत्रामध्ये ४५ विधेयक पास करण्याचं सरकारचं लक्ष्य होतं. पण बजेट सत्राच्या शेवटच्या दिवशी मोदी सरकार कोणतं महत्त्वाचं बिल आणणार आहे यावर कोणीही बोलायला तयार नाही.
सुप्रीम कोर्टाने प्रमोशनमध्ये मौलिक अधिकार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर आरक्षण विरोधी असल्याची टीका केली होती. सरकारमधील मित्रपक्ष लोजपाचे खासदार देखील सुप्रीम कोर्टाच्या या निर्णय़ावर नाराज होते. सरकार एससी-एनटी वर्गाच्या लोकांना खूश करण्यासाठी महत्त्वाचं विधेयक राज्यसभेत आणू शकते.
2018 मध्ये एससी, एसटी कायद्यात बदल करण्याच्या शक्यतेनंतर देशभरात हिंसक आंदोलन झाले होते. त्यानंतर मोदी सरकारने कायदा बनवत कोर्टाचा निकाल पलटवला होता. भाजप लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणण्याची देखील चर्चा आहे.
31 जानेवारीला बजेट सत्र सुरु झालं होतं. यानंतर २ मार्च ते ३ एप्रिल दरम्यानं दुसरं सत्र चालणार आहे.