अमेठी : केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार काँग्रेसनंच सुरू केलेल्या योजनांची पुन्हा पुन्हा उद्घाटनं करतंय, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलीय.
राहुल गांधी सध्या अमेठी या आपल्या मतदारसंघात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आमचे भाजपमधले मित्र यूपीए सरकारनंच सुरू केलेल्या योजनांची उद्घाटन करतायत... अमेठीच्या लोकांसाठी आम्ही सुरू केलेली कामं निदान प्रत्यक्षात येतायत, याचाच मला आनंद आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
येत्या १० ऑक्टोबरला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीत विविध योजनांची सुरूवात करणार आहेत. ९० कोटींचं हॉस्पिटल, एफएम रेडिओ, सैनिक शाळा, राजीव गांधी हवाई वाहतूक विद्यापीठ आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अशा विविध प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. ही सगळी काँग्रेसच्या सरकारच्या काळात सुरू झालेली कामं आहेत, असा दावा राहुल गांधींनी केलाय.