लोकसभेनंतर राज्यसभेतही भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल

राज्यसभेत एनडीएची बहुमत आल्याने अनेक विधेयकं मंजूर होतील.

Updated: Jun 21, 2019, 09:29 AM IST
लोकसभेनंतर राज्यसभेतही भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर ही भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे तीन तलाक विरोधी विधेयक सारखे अनेक विधेयकं राज्यसभेत पास होऊ शकलेले नाही. पण आता टीडीपीचे ४ राज्यसभा खासदार भाजपमध्ये आल्याने एनडीए आणखी मजबूत झाली आहे.

टीडीपीचे राज्यसभेत ६ खासदार होते. पण ४ खासदार भाजपमध्ये आल्याने भाजपची राज्यसभेतील संख्या ७१ वरुन ७५ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे टीडीपीच्या २/३ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करत विलिनीकरणाचा प्रस्ताव दिल्याने ते राज्यसभेचे सदस्य राहणार आहेत.

राज्यसभेत एकूण २४५ सदस्य आहेत. एनडीएकडे १०० सदस्य आहेत.काँग्रेसकडे राज्यसभेत ४८ तर टीएमसीकडे १३ खासदार आहेत. बहुमतासाठी २२४ चा आकडा गाठणं गरजेचं आहे. 

राज्यसभेत एनडीएचं संख्याबळ

भाजप- ७१

अन्नाद्रमुक- १३

जदयू- ०६

अकाली दल- ०३

शिवसेना- ०३

नॉमिनेटेड- ०३

आरपीआय- ०१

२०२० पर्यंत मिळणार बहुमत

बिहार आणि गुजरातमध्ये राज्यसभेच्या ३ जागांवर निवडणूक होणार आहे. रविशंकर प्रसाद, अमित शाह आणि स्मृती इराणी हे लोकसभेचे खासदार झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. या ३ ही जागा भाजपला मिळणार आहेत. यूपीमध्ये १० जागांवर निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये भाजपला अधिक जागा मिळतील. ९ जागा या सध्या विरोधकांकडे आहेत. सपाकडे ६, बसपाकडे २ आणि काँग्रेसकडे १ जागा आहे.

बीजेडी आणि वायएसआर काँग्रेस हे भाजपच्या बाजुने उभे राहतील ही शक्यता आहे. तक काही पक्ष वॉक आऊट करुन जाऊ शकतात. ज्याचा फायदा भाजपलाच होईल. त्यामुळे लोकसभेनंतर राज्यसभेतही भाजप मजबूत होईल.