अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्या फैरी झाडल्या जात असल्याचं पहायला मिळत आहे. आता पाटीदार समाजाचं आंदोलन करणाऱ्या हार्दिक पटेलने भाजपवर हल्ला चढवला आहे.
भाजपने हार्दिक पटेलचं कथीत सेक्स सीडी प्रकरण बाहेर काढल्यानंतर आता त्याने भाजपला चिमटा काढला आहे.
सीडी बनविण्याच्या नादात भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा बनवण्याचं विसरुन गेल्याचा टोला भाजपला लगावला आहे.
हार्दिक पटेलने यासंदर्भात ट्विटही केलं आहे.
CD बनाने के चक्कर में भाजपा घोषणा पत्र बनाना भूल गई,कल वोटिंग हैं।
— Hardik Patel (@HardikPatel_) December 8, 2017
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरल्यावर त्यांना काँग्रेसने तातडीने निलंबित केले. मात्र, यापूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्षेपार्ह आणि अपशब्द वापरत टीका केली होती पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही असेही हार्दिक पटेलने म्हटलं आहे.
कोंग्रेस पार्टी के नेता ने ग़लत शब्द का इस्तेमाल किया और कोंग्रेस पार्टी ने उसको ससपेंड कर दिया,लेकिन अभी के प्रधानमंत्री जब CM थे तब चुनाव प्रचार में हिंदुस्तान की बहु को बार गर्ल कहते थे क्या वो ठीक था !!!
— Hardik Patel (@HardikPatel_) December 8, 2017
दरम्यान, हार्दिक पटेलच्या ५ कथित सेक्स सीडी समोर आल्या आहेत. ज्या सीडीज समोर आल्या आहेत त्यामध्ये हार्दिक पटेलशी मिळता जुळता व्यक्ती एका महिलेसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत पहायला मिळत आहे. या व्हिडिओंमागे भाजपचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.