भाजपा अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिर बांधूनच दाखवेल- अमित शाह

अयोध्येत राम जन्मभूमीवर राम मंदिर बनवण्यासाठी भाजपा कटीबद्ध असल्याचे वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे.

Updated: Feb 8, 2019, 06:17 PM IST
भाजपा अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिर बांधूनच दाखवेल- अमित शाह  title=

महाराजगंज : अयोध्येत राम जन्मभूमीवर राम मंदिर बनवण्यासाठी भाजपा कटीबद्ध असल्याचे वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. गोरखपूर येथे बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधताना त्यांनी हा पुरनरुच्चार केला. मायावती, अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी रामजन्मभूमिवर आपली भूमिका देशासमोर ठेवावी असे म्हणत सपा-बसपा आणि कॉंग्रेस यांच्यावर निशाणा साधला. राम मंदिर त्याच जागी बांधण्याच्या निर्णयाच्या बाजूने आहेत की नाही ? हे कॉंग्रेस, सपा आणि बसपा यांनी स्पष्ट करावे असेही त्यांनी सांगितले. हे लोक बोलूदेत अथवा नाही पण भाजपा राम मंदिर बनवून राहणारच असेही त्यांनी स्पष्ट केले. 

विरोधी पक्षांच्या महायुतीमुळे काळजी करण्याचे मुळीच कारण नाही. उत्तर प्रदेशचा निकाल भिंतीवर दिसतोय ती इथे 2019 लोकसभा निवडणूकीत 73 ऐवजी 74 जागा असतील आणि यूपीची जनता विरोधकांची महायुती साफ करुन टाकेल. 

Image result for amit shah zee news

वर्षानुवर्षे देशात मागास, अति मागास आणि ओबीसी आपल्या संविधानिक मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. पण कॉंग्रेस, सपा आणि बसपा यांनी इतके वर्षे केवळ राजकारणच केले. भाजपाने या मागास आणि ओबीसी वर्गाला सांविधानिक मान्यता देण्याचे काम केले. सपा-भाजपाच्या सरकारवेळी निजामी राज होते. नसीमुद्दी भाई होते, इम्रान भाई होते, अफजल भाई होते, आजम खान आणि मुख्तार होते. भाजपा या निजामांना उखाडण्याचे काम केले आहे.