कर्नाटक निवडणूकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रीय बँकांमधून पीकांसाठी घेतलेलं १ लाखांपर्यंतचं कर्ज माफ करू अशी घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली. 

Updated: May 4, 2018, 01:32 PM IST
कर्नाटक निवडणूकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध  title=

कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. सत्तेत आल्यावर राष्ट्रीय बँकांमधून पीकांसाठी घेतलेलं १ लाखांपर्यंतचं कर्ज माफ करू अशी घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली.  याशिवाय शेतकऱ्यांना १० तास सलग वीज, दारिद्र रेषेखालच्या महिलांना मोफत स्मार्ट फोन अशा अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस जाहीरनाम्यात पाडण्यात आलाय. त्याचप्रमाणे प्रत्येक  कर्नाटकातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मोफत लॅपटॉप  देण्यात येईल असंही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलंय.

जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे 

राज्यातील शेतकऱ्यांचे रास्ट्रीय बंकामधील कर्ज १ लाखा परियंत माफ करणार... 

मुख्यमंत्री विभागात रयत बंधू विभागत.. 

शेतकऱ्याना १० तास विज देणार 

मुख्यमंत्री फेलोशिप देणार 

गोहत्या कायदा आमलात आणनार... 

दुधाचे उत्पादन वाढाव या साठी प्रयत्न...

महिला सबलीकरणावर भर देणार 

BPL धारक सर्व महिलांना स्मार्ट फोन..

BPL कुटूंबातील मुलिंच्या लग्नाकरीता २५ हजार रुपये देणार...

राज्यातील सर्व कोलेजच्या विध्यार्थाना Laptop मोफत देणार...

मुख्यमंत्री कंटिन योजना राज्यभर राबवीणार.