नवी दिल्ली : आंध्रप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तेलगू देशम पक्ष यांच्यातील युती तुटण्याच्या मार्गावर आहे.
बजेटवर नाराज असणाऱ्या टीडीपी आणि भाजपमध्ये वाद वाढत चालला आहे. राज्यातील भाजप नेतृत्वाने म्हटलं की, युती तुटली तरी काही फरक नाही पडणार.
भाजपने बजेटमध्ये आंध्रप्रदेशला काहीच नाही दिल्याचा आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर करण्यात आला. अर्थमंत्र्यांनी पब्लिक मिटींग कराव्यात. राज्याला गेल्या ४ वर्षात काय मिळालं हे लक्षात येईल. चंद्रबाबू नायडू सरकारमधील मंत्री पी मानिकला राव यांनी म्हटलं की, 'आम्ही २ पर्याय केंद्रीय नेतृत्वापुढे ठेवले आहेत. जर टीडीपी सोबत युती तुटली तरी काहीही फरक नाही पडत.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी स्पष्ट केलं आहे की, 'पक्षाचे खासदार राजीनामा नाही देणार. खासदारांनी राजीनामा दिला तर राज्यासाठी कोण लढेल.'
'केंद्राने राज्यासोबत न्याय केला पाहिजे. मी फक्त न्याय मागत आहे. पण वायएसआरसीपी, भाजप दोन्ही पक्ष माझी आलोचना करत आहेत. काँग्रेस मला दोषी ठरवत आहे. ही चांगली गोष्ट नाही. काँग्रेसने राज्याच्या विभजनावेळी अन्याय केला. आता भाजप देखील केलेले आश्वासन पाळत नाही आहे.
आंध्रप्रदेश आणि केंद्र सरकारमध्ये एनडीएचा घटर पक्ष टीडीपीने राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. नवीन रेल्वे झोन आणि नवी राजधानी अमरावतीच्या निर्माणासाठी निधी देण्याचं वचण पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बजेट 2018-19 मध्ये राज्याला काही खास न मिळाल्याने टीडीपीने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत विरोध सुरु केला आहे.