वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा

वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बीटिंग द रिट्रीट सोहळा मोठ्या दिमाखात सुरू आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभुमीवरही या सोहळ्याचे महत्त्व आहे. त्यामुळे दोन्ही देशातील नागरिकांचे लक्ष या दिमाखदार सोहळ्याकडे लागून राहिले आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट तर पाकिस्तानचा १४ ऑगस्ट आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 14, 2017, 07:39 PM IST
 वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा title=

नवी दिल्ली : वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बीटिंग द रिट्रीट सोहळा मोठ्या दिमाखात सुरू आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभुमीवरही या सोहळ्याचे महत्त्व आहे. त्यामुळे दोन्ही देशातील नागरिकांचे लक्ष या दिमाखदार सोहळ्याकडे लागून राहिले आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट तर पाकिस्तानचा १४ ऑगस्ट आहे. 

 भारताच्या सैन्य दलाच्या सामर्थ्याचं दर्शन जगाला घडवल्यानंतर बीटींग द रिट्रीटमध्ये सैन्य दलाचे बँड पारंपरिक सूरांच्या तालावर मार्च काढतात. देशभक्तीचे हे सूर जवानांमध्ये नवा जोष संचारतो. या सूरांमुळे  प्रत्येक भारतीयाची हिंमत, धैर्य कित्येकपटीने वाढते. दोन्ही देशांचे जवान समोरासमोर आल्यानंतर दोन्ही देशांच्या लोकांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. अंगावर रोमांच उभा करणारा हा सोहळा मोठ्या दिमाखात सुरू आहे. प्रत्येक भारतीयाची नजर आपल्या जवानांकडे खिळली आहे. अंगावर काटा आणणारा रोमांचक क्षण याठिकाणी सुरु आहे. 

 पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी देशाच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वाघा बॉर्डरवर सर्वात उंच असलेला राष्ट्रध्वज फडकवला आहे. 'डॉन'
 च्या वृत्तानुसार १२० फुट *८० फुट ध्वज ४०० फुटाच्या उंचीवरून मध्यरात्री फडकवला गेला. दक्षिण आशियात हा ध्वज सर्वात उंच आहे तर जगामध्ये आठव्या स्थानावर आहे. ७७ वर्षापूर्वी लाहोरमध्ये पाकिस्तानच्या संकल्पाचा उदय झाल्याचे यावेळी लष्कर प्रमुखांनी सांगितले.