बर्ड फ्यू माणसांमध्ये पसरतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

खबरदारीचा उपाय म्हणून परराज्यातल्या कोंबड्या आणि अंड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

Updated: Jan 11, 2021, 05:49 PM IST
बर्ड फ्यू माणसांमध्ये पसरतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत  title=

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचं सावट अद्याप कायम आहे. अशात देशामध्ये बर्ड फ्यूने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात देखील बर्ड फ्यूचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रानंतर दिल्ली आणि केरळ बर्ड फ्यूच्या विळख्यात सापडले आहे. गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात देखीस बर्ड फ्यूचा धोका निर्माण झाला आहे. या राज्यांमध्ये कावळ्यांशिवाय इतर पक्ष्यांना देखील बर्ड फ्यूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 
 
बर्ड फ्यूचा वाढता धोका लक्षात घेत राज्यांचे प्राणी व पक्षी विभाग सतर्क ठेवण्यात आले आहेत. दरम्यान बर्ड फ्यूच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. वैज्ञानिकांच्या मते हा विषाणू पक्ष्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतो, मात्र या संसर्गाची शक्यता फार कमी असते.

त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती जर संक्रमीत पक्ष्याच्या सहवासात अधिक काळ राहीला, तर त्या व्यक्तीस देखील बर्ड फ्यू विषाणूची लागण होणाची दाट शक्यता असते. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या रिपोर्टनुसार H5N1मुळे मृत्यूचे प्रमाण सुमारे 60 टक्के आहे, हे प्रमाण कोरोना व्हायरसच्या तुलनेत अधिक आहे. 

त्यामुळे H5N1पासून वाचण्यासाठी पक्ष्यांपासू दूर राहणं योग्य असल्याचं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलं आहे. हा रोग पक्ष्यांच्या विष्ठा, लाळ, नाक-तोंडाच्या माध्यमातून देखील पसरू शकतो. त्यामुळे चिकन खरेदी केल्यानंतर हातमोजे घालून साफ करण्याचा सल्ला देखील वैज्ञानिकांनी दिला आहे. 

खबरदारीचा उपाय म्हणून परराज्यातल्या कोंबड्या आणि अंड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं तुम्ही देखील नॉन व्हेज खात असाल तर अंडी आणि चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घ्या.  हॉटेलातून फूड मागवण्याऐवजी घरच्या जेवणालाच सध्या प्राधान्य द्या.