पटना : बिहार निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासावर एनडीएला आशा आहेत. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ रॅली करणार आहेत. ही रॅली केवळ भाजपसाठी नसून एनडीएसाठी असतील. यावेळी मंचावर मुख्यमंत्री नितीश कुमार देखील उपस्थित राहणार आहेत. पटनामध्ये पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती देण्यात आली.
पंतप्रधानांची रॅली महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण एनडीएसाठी असेल असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री नितीश कुमार देखील सोबत असतील. मुख्यमंत्री नसले तर त्यांच्या पक्षाचे नेते असतील. २३ ऑक्टोबरला सासाराम, गया आणि भागलपूरमध्ये रॅली होईल. २८ ऑक्टोबरला दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पटनामध्ये रॅली असेल. १ नोव्हेंबरला छपरा, पूर्वी, चंपारण आणि समस्तीपूरमध्ये रॅली असेल.
३ नोव्हेंबरला पश्चिम चंपारण, सहरसा आणि फारबिसगंजमध्ये रॅली असेल. एनडीएच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, रविशंकर प्रसाद, मंगळ पांडे, जेडीयूतून संजय झा आणि दानिश रिझवान उपस्थित होते.
भाजप नेता मंगल पांडेयने भाजपकडून रिपोर्ड कार्ड जाहीर करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या काम या कार्डमध्ये आहेत. रिपोर्ट कार्ड घेऊन कार्यकर्ते लोकांमध्ये जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.