मणिपूर, बंगाल अन् आता बिहार... तरुणीला विवस्त्र करुन बंद खोलीत बेदम मारहाण

Bihar Crime : बिहारच्या बेगुसरायमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मारहाणी दरम्यान मुलगी विनवणी करत राहिली पण लोकांनी तिचे ऐकले नाही.

आकाश नेटके | Updated: Jul 22, 2023, 03:57 PM IST
मणिपूर, बंगाल अन् आता बिहार... तरुणीला विवस्त्र करुन बंद खोलीत बेदम मारहाण title=
(प्रातिनिधीक छायाचित्र - PTI)

Crime News : मणिपूर (Manipur), पश्चिम बंगाल पाठोपाठ आता बिहारमधूनही (Bihar Crime) मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बिहारमधील बेगुसरायमध्ये (Begusarai) एका तरुणी आणि पुरुषाला विवस्त्र करून बंद खोलीत जबरदस्त मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बिहार पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉस्को कायदा, एससी एसटी आयटी कायद्याच्या कलमांखाली पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी गायक असलेल्या एका पुरुषासोबत असताना गावातल्या काही लोकांनी त्यांना मारहाण केली होती.

गावातील लोकांनी गायकाला तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडले. त्यानंतर दोघांनाही बंद खोलीत नग्न करून बेदम मारहाण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. व्हायरल व्हिडिओमध्ये दोघेही अर्धनग्न अवस्थेत आहेत. तर काही लोक त्यांना मारहाण करत व्हिडिओ काढत असल्याचे दिसत आहे. मुलगी कपड्याने स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करत होती. मात्र आरोपींनी त्यांना मारहाण सुरुच ठेवली. हार्मोनियम शिकविण्याच्या बहाण्याने या गायकाने तरुणीसोबत जबरदस्ती केल्याचा गावातल्या लोकांचा आरोप होता. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुलीवर अत्याचार करणाऱ्या गायकालाही पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणाची माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक योगेंद्र कुमार म्हणाले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी किशनदेव चौरसिया बेगुसराय याला अटक करण्यात आली आहे. या घटनेत चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर बलात्कार, पॉक्सो कायदा, एससी-एसटी, हल्ला आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी, इतर आरोपींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी बेगुसराय पोलीस स्टेशन हद्दीतील पाकथॉल गावातून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये एक गायक आणि एका अल्पवयीन मुलीला आक्षेपार्ह स्थितीत रंगेहात पकडण्यात आले होते. यानंतर लोकांनी गायक आणि मुलीला बेदम मारहाण केली. मुलगी विनवणी करत राहिली पण तिचे कोणीही ऐकले नाही. मुलीचे सर्व कपडे फाडून आरोपींनी तिला मारहाण केली. पीडितेने या घटनेची माहिती महिला पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना दिली. पीडितेने सांगितले की, गायक किशून देव चौरसिया याने घरी हार्मोनिअम शिकवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, गावातील आणखी तीन जण तेथे पोहोचले आणि त्यांनी आम्हाला मारहाण केली.

दरम्यान, पोलिसांनी मारामारीत सहभागी असलेल्यांचीही ओळख पटवली आहे. या मारहाणीत गावातील रामजतन पासवान, रवींद्र ठाकूर आणि दिलीप पंडित यांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयात पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून रविवारी जबाब नोंदवला जाणार आहे. पोलिसांनी पीडितेचे कपडे वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून पुरावेही गोळा करण्यात आले आहेत.