कपडे घेण्याच्या बहाण्याने दीर गेला घेऊन, पाच महिने... धक्कादायक घटना समोर

स्वस्त कपडे मिळतात सांगून दीराने वहिनीसोबत केलं घृणास्पद कृत्य

Updated: Sep 16, 2022, 08:04 PM IST
कपडे घेण्याच्या बहाण्याने दीर गेला घेऊन, पाच महिने... धक्कादायक घटना समोर  title=

Bihar Crime News : एका दीराने त्याच्या वहिनीला कपडे घेण्याच्या बहाण्याने गुजरातला नेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाहीतर माघारी परतल्यावरही आरोपी दीराने दुकानामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. याबाबत पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

नक्की काय आहे प्रकरण?
पीडित महिलेचं रेडिमेड कपड्यांचं दुकान होतं. याचाच फायदा घेत तिच्याच दीराने, गुजरातमध्ये कपडे स्वस्त कपडे असून ते आपण घेऊ असं सांगितलं. कमी पैशात कपडे म्हणडे जास्त नफा होईल या आशेने पीडित महिलेने दीराच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. 3.50 लाख रूपये घेऊन दोघे गुजरातला गेले.

गुजरातला गेल्यावर तिथं आरोपी दीर पीडितेला एका रूममध्ये घेऊन जातो. रूममध्ये  गेल्यावर त्याचं खरं रूप समोर येतं. त्यानंतर जवळपास पाच महिने पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवलं. विरोध केल्यावर तिला मारहाण केली, तिकडून माघारी आरोपी पुन्हा महिलेला घरी आणतो.  घरी आल्यावरही पीडितेच्या दुकानामध्ये जाऊन तिला धमकावत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याचं पीडित महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, ही घटना बिहारच्या पटनामधील गोपालगंज इथली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत प्रकरणाचा तपास करत असून आरोपी दीराचा पोलीस शोध घेत आहेत.